Friday, July 24, 2026
गोंदिया

रजेगांव येथे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर

गोंदिया – आरोग्य उपकेंद्र रजेगांव, ता.गोंदिया येथे जनसेवा सप्ताहानिमित्त लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन खासदार श्री प्रफुल पटेलजी व खासदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

या आरोग्य शिबिरामध्ये यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आजारांचे निदान, आवश्यक वैद्यकीय सल्ला तसेच औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर च्या चम्मुचे सहकार्य लाभले यात अधिष्ठाता डॉ कुसुमाकर घोरपडे, शल्य चिकीत्सक डॉ पुरुषोत्तम पटले, डॉ संजय माहुले, डॉ आनित आटे, डॉ गुरुप्रकाश खोब्रागडे, डॉ रणजित खरोले, डॉ आरुश मुंन्डे, डॉ मयूर मेश्राम, डॉ मोहित गजभिये, डॉ सुप्रिया बोरकर व वैद्यकीय कर्मचारी यांनी सहकार्य केले. आरोग्य शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी सर्वश्री केतन तूरकर, अखिलेश सेठ सहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!