खासदार प्रफुल पटेल दोन दिवसीय दौऱ्यावर*
गोंदिया – खासदार श्री प्रफुल पटेलजी दोन दिवसीय दौऱ्यावर असून भंडारा व गोंदिया येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दिनांक 1ऑगस्ट 2026 शनिवारला सायं. 4.30 ते 6.00 वाजता पर्यंत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा व भेट, दिनांक 2 ऑगस्ट रविवारला सकाळी 11 वाजता आशीर्वाद लॉन, सडक अर्जुनी येथे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विधानसभा स्तरीय समाधान शिबिर येथे उपस्थिती, दुपारी 2.30 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, भंडारा येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 
वरील कार्यक्रम दरम्यान त्यांच्या सोबत खासदार श्री राजेंद्र जैन व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार असून पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
