Sunday, September 20, 2026
सड़क अर्जुनी

भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मीकांत वानोसा धानगाये यांचे निधन

सडक अर्जुनी – तालुक्यातील खोंबा (पोस्ट- परसोडी) येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते श्री. लक्ष्मीकांत वानोसा धानगाये यांचे अल्पशा आजाराने २ ऑगस्ट  रोजी दुःखद निधन झाले. यांचे अंतिम संस्कार आज दुपारी २ वाजता खोबा येथील मोक्षधाम येथे होणार आहे. धानगाये यांच्या निधनामुळे भाजप परिवारासह सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

श्री. लक्ष्मीकांत धानगाये यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. ते माजी पंचायत समिती सदस्य, आदिवासी सेवा सहकार सोसायटी कनेरीचे माजी अध्यक्ष, भाजपचे माजी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, राशन दुकानदार संघटना सडक अर्जुनी चे अध्यक्ष ,संजय गांधी श्रवणबाळ योजनेचे माजी अध्यक्ष, भाजप सडक अर्जुनी तालुक्याचे माजी अध्यक्ष तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

समाजकारण व राजकारणातील त्यांच्या कार्याचा ठसा अनेकांच्या मनावर उमटला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच तत्पर राहिले. त्यांच्या साध्या, मनमिळावू आणि सेवाभावी स्वभावामुळे त्यांना समाजात विशेष मान-सन्मान प्राप्त झाला होता.

त्यांच्या निधनाने परिसरातील सामाजिक, राजकीय व आदिवासी समाजाची मोठी हानी झाली असून, विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

 

“आपली स्मृती सदैव आमच्या हृदयात राहील.”

 

भावपूर्ण श्रद्धांजली. 💐🕯️

error: Content is protected !!