आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त सडक अर्जुनीत ध्वजारोहण
सडक अर्जुनी : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन सडक अर्जुनी शहर व परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सडक अर्जुनी येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. 
स्वातंत्र्यदिनानिमित्त आमदार बडोले यांनी सडक अर्जुनी येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहून ध्वजारोहण केले. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिन कार्यक्रमातही त्यांनी उपस्थित राहून ध्वजारोहण केले.

यावेळी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना आमदार राजकुमार बडोले यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना त्यांनी विनम्र अभिवादन केले. 
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
