Wednesday, October 14, 2026
सड़क अर्जुनी

मोरगाव अर्जुनी विधानसभा समन्वयकपदी महेश डुंबरे यांची नियुक्ती; जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान

सडक अर्जुनी | प्रतिनिधी – सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथील युवा नेतृत्व महेश भाऊ शंकरजी डुंभरे यांची शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या वतीने मोरगाव अर्जुनी विधानसभा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय सुरेंद्रजी नायडू यांच्या हस्ते जिल्हा कार्यालयात महेश भाऊ डुंभरे यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीमुळे मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील पक्षाच्या संघटनात्मक कार्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

महेश भाऊ डुंभरे हे कोहमारा परिसरातील युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. तरुणांमध्ये त्यांचा संपर्क असून, सामाजिक आणि संघटनात्मक कार्याच्या माध्यमातून त्यांनी परिसरात आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

या नियुक्तिप्रसंगी शिवसेनेचे सडक अर्जुनी तालुकाप्रमुख विलास कापगते, दलित सेना प्रमुख विकी तागडे, सडक अर्जुनी शहरप्रमुख उमराव मांढरे, ओमप्रकाश दखणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मिळालेली ही जबाबदारी महेश भाऊ डुंभरे यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आता मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ते कशा प्रकारे कार्य करतात, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.