Thursday, November 5, 2026
गोंदिया

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या कार्याला यश.; गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांना पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी लागू.

गोंदिया –  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या प्रदीर्घ लढ्याला यश. गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांना जुलै 2002 पासून पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी लागू केल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय लायकरामभाऊ भेंडारकर, सन्माननीय आमदार विनोदभाऊ अग्रवाल, सन्माननीय आमदार विजयभाऊ रहांगडाले, सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जेनिथचंद्र दोन्तुला, सन्माननीय उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुरेशभाऊ हर्षे, सन्माननीय उप मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, सन्माननीय शिक्षणाधिकारी पवन खंदारे यांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.

किशोर बावनकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया.

आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना 6 ऑगस्ट 2002 च्या शासन निर्णयानुसार एकस्तर वेतनश्रेणी देण्याचे निर्देश आहेत.तसेच 29 फेब्रुवारी 2024 च्या परिपत्रकानुसार आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी लागू करण्याचे निर्देश आहेत.

परंतु जिल्हा परिषद प्रशासन गोंदियाच्या काही बाबतीतील संभ्रम दूर करण्यासाठी शासनाला मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यानुसार 16 ऑक्टोबर 2026 ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या प्रयत्नाने शासनाचे मार्गदर्शन प्राप्त झाले त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी आज पत्र काढून गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांना न्याय दिल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांना दिवाळी भेट मिळाल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त करीत आहेत.