Wednesday, May 6, 2026
क्राइमगोंदिया

LCB कारवाईत सुगंधित तंबाखूची तस्करी करणारे साहित्यासह ताब्यात

गोंदिया,दि.१९ मार्च : शासनाने अनेक अमली पदार्थावर बंदी आणली आहे. मात्र याचा व्यवसाय आजही अवैधरित्या सुरू आहे. अशातच शासनाने प्रतिंबधीत केलेल्या सुगंधीत तंबाखुची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून सुगंधित तंबाखूचे १८०० डब्बे व १ वाहन असा एकूण १२ लाख ७० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १७ मार्च रोजी गोंदिया-बालाघाट मार्गावरील विजयनगर येथे करण्यात आली.

सविस्तर असे की, १७ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सुगंधित तंबाखू विषयी गोपनिय माहीती मिळाली, बालाघाट येथुन चारचाकी वाहनाने दोन इसम अवैद्यरित्या प्रतिबंधीत केलेले तंबाखु विक्री करण्यासाठी गोंदिया येथे येत आहेत. त्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत विजयनगर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकाद्वारे टाटा नेक्सांन चारचाकी वाहन क्रमांक एम. एच. ३५/ए. सी. ६३६९ येतांना दिसली सदर वाहनास पोलीस पथकाने थांबवुन वाहन चालक, मालक व वाहनाची पंचासमक्ष झडती घेण्यात आली.

वाहनामध्ये ०९ नग खाकी रंगाचे खरडे बॉक्स ज्यामध्ये प्रत्येक बॉक्स मध्ये २०० डब्बे शासनाने प्रतिबंधीत केलेले सुंगंधित ईगल कंपनीचा तंबाखु एकुण किमती २ लाख ७० हजारचा माल मिळुन आल्याने आरोपी रितेश रामलाल नागदेवे (४५) रा. देसाईगंज (वडसा) जि. गडचिरोली व नेताजी लोचन गणविर (३२) रा. कुरुड ता. देसाईगंज जि. गडचिरोली यांचे विरुध्द सपोनि धिरज राजुरकर यांचे तक्रारीवरून पो. स्टे. रामनगर येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपीकडुन ९ नग खाकी रंगाचे खरडे बॉक्स ज्यामध्ये प्रत्येक बॉक्स मध्ये २०० डब्बे शासनाने प्रतिबंधीत केलेले सुगंधित ईगल कंपनीचा तंबाखु २ लाख ७० हजार व १० रुपये किंमतीचे वाहन असाएकूण १२ लाख ७० हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

सदरची कारवाई गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी दिलेले निर्देश सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकरयांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज राजुरकर, पो. हवा. संजय चव्हाण, सफौ राजु मिश्रा, पो.हवा. सोमेन्द्रसिंह तुरकर, पोहवा तुलसीदास लुटे, पोहवा दिक्षीतकुमार दमाहे, पो. शि. राकेश इंदुरकर, चापोशि राम खंडारे यांनी केली आहे.

error: Content is protected !!