Saturday, June 13, 2026
गोंदिया

गोंदियाला नवे जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या प्रशासकीय नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल झाला असून, जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची पुणे येथे बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र औद्योगिक कृषी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावले यांची गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमरानीकर यांनी जारी केले आहेत.

मंगेश गोंदावले यांच्या नियुक्तीमुळे गोंदिया जिल्ह्याच्या विकासकामांना नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निश्चितच फायदा होणार आहे.

error: Content is protected !!