महाविकास आघाडीकडून काँग्रेस समर्थित प्रफुल अग्रवाल यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
भंडारा,दि.०१ जून-भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या( विधानपरिषद) निवडणुकीकरीता आज (दि.१) शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीकडून काँग्रेस समर्थित म्हणून प्रफुल गोपालदास अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यावेळी आमदार नाना पटोले,खासदार प्रशांत पडोले, गोंदिया नगर परिषद अध्यक्ष सचिन शेंडे, जिल्हा मध्यवर्ती बैंक संचालक अशोक गुप्ता, श्रीमती जयश्री बोरकर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते,जिल्हा परिषद व नगरपरिषद,नगरपंचायतचे सदस्य उपस्थित होते.

तर आगामी भंडारा/गोंदिया जिल्हा (स्थानिक स्वराज्य संस्था)विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. आमदार श्री. दिलीपजी बन्सोड यांचा सुद्धा नामनिर्देशन अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे सुपूर्त केला.यावेळी भंडारा/गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, मा.आमदार गोपालदास अग्रवाल, गोंदिया नगर परिषद अध्यक्ष श्री. सचिन शेंडे, जिल्हा सहकारी बैंक संचालक श्री. अशोक गप्पूजी गुप्ता, श्रीमती जयश्रीताई बोरकर यांच्यासह जिल्हा परिषद तथा नगरपरिषद सदस्य उपस्थित होते.
