Monday, June 15, 2026
सड़क अर्जुनी

राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांचे सडक अर्जुनीत स्वागत

सुशिल लाडे….

सडक अर्जुनी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांचे सडक अर्जुनी येथे आज आगमन झाल्यानंतर माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांच्या निवासस्थानी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी आमदार राजकुमार बडोले, शारदा राजकुमार बडोले तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन व शाल श्रीफळ अर्पण करून खासदार राजेंद्र जैन यांचा सत्कार केला. राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी विविध सामाजिक, विकासात्मक व जनहिताच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी खासदार राजेंद्र जैन यांच्याशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या. खासदारांनीही सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

या स्वागत कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष अविनाश काशिवार , लोकपाल गहाणे, रजनी गिरेपुंजे, किशोर तरोने, तेजराम मडावी, शिवाजी गहाणे, रमेश चुऱ्हे, नगरपंचायत स.अर्जुनीचे पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

error: Content is protected !!