Sunday, June 28, 2026
सड़क अर्जुनी

हल्लाबोल! पाच कोटींच्या तलाव सौंदर्यीकरणाची दुर्दशा; जनावरांच्या अवशेषांनी परिसर प्रदूषित, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप

सडक अर्जुनी – सडक अर्जुनी नगरपंचायतीने कोट्यवधी रुपये खर्च करून विकसित केलेला तलाव सौंदर्यीकरण परिसर आज अस्वच्छता, दुर्गंधी आणि जनावरांच्या कत्तलीनंतरच्या अवशेषांनी विद्रूप झाल्याचे चित्र समोर आले आहे. परिसरात विखुरलेले चामडे, मांसाचे तुकडे, आणि इतर अवशेष यामुळे असह्य दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

सडक अर्जुनी नगरपंचायत ने शहरातील नागरिक यांचे  स्वऻस्थ योग्य राहावे , नागरिकांना योग्य वातावरण मिळावे, स्वच्छ वातावरणात नागरिकांनी आवागमन करून स्वच्छ हवेचा आस्वाद घेता यावा याकरिता या तलावाचे सौंदर्य करण पाच करोड रुपये निधी खर्च करून तयार करण्यात आले असे फलक लावण्यात आले.

सौंदर्यीकरण परिसरात फेकलेले चामडे, शेपडी, मांस इत्यादी अवशेष..

या गार्डन मध्ये फिरण्यासाठी येणारा हा परिसर आता दुर्गंधी आणि घाणीचे केंद्र बनल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एवढ्या मोठ्या सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे जनावरांच्या अवशेषांची विल्हेवाट लावली जात असेल, तर संबंधित यंत्रणा नेमकी काय करत आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) कायदा, १९९५’ नुसार गाय, वळू आणि बैल (गोवंश) यांच्या कत्तलीवर, तसेच त्यांच्या मांसाची (गोमांस) खरेदी, विक्री आणि वाहतुकीवर पूर्णपणे बंदी आहे. हा कायदा मूळच्या ‘महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, १९७६’ मध्ये सुधारणा करून मार्च २०१५ मध्ये अधिक कडक स्वरूपात लागू करण्यात आला. तरीसुद्धा या परिसरात बेकायदेशीर कत्तल आणि मांस विक्रीसंदर्भातील हालचाली सुरू आहेत. या आरोपांची तातडीने चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे ही पोलीस प्रशासन, नगरपंचायत, महसूल विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, कोट्यवधी रुपयांचा विकास प्रकल्प असलेल्या या परिसरात अशी परिस्थिती निर्माण होईपर्यंत संबंधित विभागांनी प्रभावी कारवाई का केली नाही? पर्यावरण प्रदूषण, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

सौंदर्य करणाचे कामाचे फलक

शहरातील नागरिकांनी प्रशासनाला थेट प्रश्न विचारत आहे

तलाव परिसरात पडलेले जनावरांचे अवशेष कोण हटवणार? दुर्गंधीमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा कधी मिळणार? बेकायदेशीर कृत्ये होत असल्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी कधी होणार? आणि दोषींवर कठोर कारवाई कधी होणार?

आता नागरिकांची एकमुखी मागणी आहे की, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित सर्व विभागांनी संयुक्त पाहणी करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि तलाव परिसर तातडीने स्वच्छ करून नागरिकांसाठी सुरक्षित करावा.

जनतेचा पैसा विकासासाठी खर्च झाला; मग त्या विकासाचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न आता सडक अर्जुनीकर प्रशासनाला विचारत आहेत. प्रशासनाने तातडीने कृती केली नाही, तर नागरिकांमध्ये रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

” नगरपंचायत ने यापूर्वी ठराव पारित केला आहे. दोषींवर योग्य ती कारवाही करण्यात येईल. सौंदर्य करणाचे परिसर स्वच्छ करण्यात येयील” 

मुख्याधिकारी – सारंग खांडेकर न.पंचायत सडक अर्जुनी 


” गोमास जनावर कत्तल , गोमास विक्री संबंधी विषयी योग्य ती चौकशी करून कारवाही करण्यात येयील. ” 

ठाणेदार – गणेश वणारे पो. स्टेशन डूग्गीपार 

error: Content is protected !!