Sunday, August 30, 2026
सड़क अर्जुनी

डुग्गीपारचे नवनियुक्त ठाणेदार कमलेश सोनटक्के अवैध धंद्यांवर लगाम लावणार काय?

सडक अर्जुनी ( सुशिल लाडे ): डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या नवनियुक्त ठाणेदारपदी कमलेश सोनटक्के यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तालुक्यातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. डुग्गीपार चे पूर्वीचे ठाणेदार गणेश वणारे यांनी कायदा व सुव्यवस्था उत्तम रित्या कायम राखत  आपले कार्यकाळ केल्याचे नागरिकांत चर्चा रंगत असते.

गणेश वणारे यांची बदली देवरी पोलिस ठाण्यात झाली आहे. तर अर्जुनी मोरगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार कमलेश सोनटक्के हे आता डूग्गीपर पोलिस स्टेशन ची धुरा सांभाळणार आहेत. पोलिस स्टेशन डूग्गीपार  हद्दीतील  कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच विविध अवैध धंद्यांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिकांनि व्यक्त केली जात आहे.

तालुक्यात अवैध दारूविक्री त्यात मोटारसायकलने दारूच्या पेट्या वाहतूक करून बेकायदेशीर दारू विक्री, सट्टा-पट्टी, जुगार, अवैध रेती व मुरूम उत्खनन, खनिजांची बेकायदेशीर वाहतूक, गोवंश तस्करी, अमली पदार्थांची विक्री व तस्करी, प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री, परवान्याशिवाय प्रवासी वाहतूक तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांवर प्रभावी कारवाई असो कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणार अशी अपेक्षा नागरिकांनि व्यक्त केली आहे. तसेच कायद्याला न जुमानता अवैध धंदे करण्यावर पोलिस कारवाही करावी अशी मागणीही नागरिकांकडून सातत्याने होत आहे.   
कमलेश सोनटक्के दुग्गीपार पोलिस स्टेशन चे नवनियुक्त ठाणेदार

अवैध धंद्यांमुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याबरोबरच सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित गस्त, अचानक छापे, गुप्त माहितीच्या आधारे कारवाई आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

नवनियुक्त ठाणेदार कमलेश सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधातील मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविल्या जातील आणि कायद्याचा धाक निर्माण होईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.

error: Content is protected !!