Tuesday, August 18, 2026
सड़क अर्जुनी

डुग्गीपार पोलिसांची उल्लेखनीय कारवाई; १० हरविलेले मोबाईल मूळ मालकांना परत

सडक अर्जुनी/डुग्गीपार : डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरविलेल्या मोबाईलचा शोध घेऊन डुग्गीपार पोलिसांनी १० अँड्रॉइड मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केले. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांचे मोबाईल हरवल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याची दखल घेतली. CEIR पोर्टलच्या माध्यमातून तसेच सायबर सेल, गोंदिया यांच्या सहकार्याने हरविलेल्या मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने शोध घेण्यात आला. या कारवाईत एकूण १० मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले.

शोधून काढण्यात आलेले मोबाईल संबंधित मूळ मालकांना पोलीस ठाण्यात बोलावून परत करण्यात आले. तसेच नागरिकांनी मोबाईल हरवल्यास त्याबाबत तातडीने डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन करत पोलिसांकडून जनजागृती करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे (कॅम्प देवरी) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती चानपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार कमलेश सोनटक्के यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पोहवा जगदीश मेश्राम, पोहवा सुशिल रामटेके, पोना महेंद्र सोनवाने, पोशि उद्देभान रुखमोडे आणि पोशि गिरीष लांजेवार यांनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!