Thursday, September 3, 2026
सड़क अर्जुनी

सरपंच हर्ष मोदी यांच्या संकल्पनेतून सौंदडमध्ये रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम

सरपंच हर्ष मोदी यांच्या संकल्पनेतून सौंदडमध्ये रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम

•सलग चौथ्या वर्षी प्रत्येक वॉर्डात रक्षाबंधन सोहळा; सुमारे ६५० बहिणींनी बांधली सरपंचांना राखी

सौंदड : ग्रामपंचायत सौंदडचे सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांच्या संकल्पनेतून सलग चौथ्या वर्षी गावातील प्रत्येक वॉर्डात रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गावातील पेटेल वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड, गांधी वॉर्ड, शास्त्री वॉर्ड आणि कृष्णा वॉर्ड येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमांतर्गत सुमारे ६५० महिलांनी व बहिणींनी सरपंच हर्ष मोदी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. प्रत्येक वॉर्डात स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे परिसरातील महिलांना मोठ्या संख्येने सहभागी होता आले.

“माझा भाऊ, सरपंच” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्षाबंधनाच्या माध्यमातून महिला आणि ग्रामस्थांशी आपुलकीचे नाते निर्माण करण्यासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

गावातील प्रत्येक वॉर्डात झालेल्या या रक्षाबंधन सोहळ्यामुळे संपूर्ण सौंदडमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महिलांनी सरपंच हर्ष मोदी यांना राखी बांधून त्यांच्याप्रती प्रेम व विश्वास व्यक्त केला.

ग्रामपंचायत सौंदडच्या वतीने आयोजित हा रक्षाबंधन सोहळा प्रत्येक वॉर्डात उत्साहात संपन्न झाला.

error: Content is protected !!