Saturday, September 12, 2026
गोंदियासड़क अर्जुनी

८०च्या दशकात ‘टाइम ट्रॅव्हल’; AIच्या रेट्रो ट्रेंडमध्ये नेते-तरुणाई मग्न!

राजकारण्यांना लागला ८० च्या दशकाचा ‘नॉस्टॅल्जिया’; गोंदियातील नेत्यांवर ‘रेट्रो’ AI ट्रेंडची मोहिनी!

आमदार राजकुमार बडोले, आमदार विनोद अग्रवाल, जी. प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर, चेतन वळगाये सभापती प.समिती.
आमदार राजकुमार बडोले, आमदार विनोद अग्रवाल, जी. प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर, चेतन वळगाये सभापती प.समिती.
आनंद chansrikaoure
आनंद चंद्रिकापुरे

गोंदिया/ सडक अर्जुनी – सुशिल लाडे – 
सध्या सोशल मीडियावर कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘AI’च्या मदतीने जुन्या काळात डोकावण्याची जबरदस्त लाट आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील राजकारणी आणि तरुण वर्ग सध्या १९८० च्या दशकातील अनोख्या विश्वात रमल्याचे पाहायला मिळत आहे. खादीच्या कुर्त्यांमध्ये दिसणारे आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षांसारखे बडे नेते असो की पंचायत समिती चे सभापती असो नेते मंडळी आता सोशल मीडियावर चक्क जीन्स जॅकेट, बेलबॉटम पँट, गळ्यात मफलर , स्टेलिस्ट हेअर स्टाईल आणि डोळ्यांवर एव्हिएटर गॉगल अशा ‘रेट्रो हिरो’च्या अवतारात धुमाकूळ घालत आहेत.

नेत्यांचा ‘व्हिंटेज’ अंदाज सोशल मीडियावर सुपरहिट
८० च्या दशकातील क्लासिक लूक: AI तंत्रज्ञानाचा वापर करून नेत्यांनी स्वतःची चित्रे ८० च्या दशकातील बॉलिवूड नायकांसारखी तयार केली आहेत. अस्ताव्यस्त पण आकर्षक हेअरस्टाईल, शांत रस्ते आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी यामुळे या फोटोंना अस्सल व्हिंटेज टच मिळत आहे.
सदाबहार संगीताची जोड: केवळ फोटोच नव्हे, तर या पोस्टच्या पार्श्वभूमीला ८० च्या दशकातील गाजलेल्या सदाबहार गाण्यांचे ऑडिओ वापरले जात असल्याने या रील्स आणि पोस्ट्सना नेटिझन्सची पसंती मिळत आहे.
* कॅप्शनचीही चर्चा: ‘या ट्रेंडचा मोह नेते मंडळी आणि तरुणाही यांनाही आवरला नाही मात्र हे खरे …’.

१९८० का काळ म्हणजे अमिताभ बच्चन, शशी कपूर, विनोद खन्ना, यांच्या स्टायलिश लुक बेलबोटम पॅन्ट त्या काळातही कहरच केला होता. आता मात्र AI च्या द्वारे आपली फोटो ८० दशकातील असलेल्या ट्रेड सारखे नेत्यांनी आपले हे फोटो शेअर केले असून, त्यावर मतदारांकडून आणि तरुणाईकडून भन्नाट व कौतुकास्पद प्रतिक्रिया येत आहेत.

80 ट्रेड,मध्ये राकेश भास्कर, सुशील लाडे, प्रशांत शहारे,हितेश डोंगरे


नेहमी राजकीय चर्चा आणि बैठकांमध्ये व्यस्त राहणारे लोकप्रतिनिधी आता सोशल मीडियावरील या नव्या ‘रेट्रो ट्रेंड’मुळे जनतेला एका वेगळ्या, हलक्या-फुलक्या आणि रंजक अंदाजात पाहायला मिळत आहेत. तर एकीकडे तरुणही ८० ट्रेड मध्ये आपले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत.

error: Content is protected !!