खासदार प्रफुल पटेल यांनी नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत केले समस्यांचे निराकरण
गोंदिया – खासदार प्रफुल पटेल यांनी आज रामनगर बगीचा येथील आपल्या निवासस्थानी कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या विविध अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या. 
यावेळी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांनी प्रशासकीय अडचणी तसेच जनहिताच्या प्रश्नांबाबत खासदार श्री. प्रफुल पटेल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सर्वांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आवश्यक त्या कार्यवाही करून समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी खासदार श्री राजेंद्र जैन यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
