सडक-अर्जुनी न्यायालयाचा निकाल; महिलांचा विनयभंग करणाऱ्या दोघांना न्यायालयाची शिक्षा
पोलिस वार्ता पत्र –

सडक-अर्जुनी : महिलांच्या विनयभंगाच्या दोन स्वतंत्र प्रकरणांत सडक-अर्जुनी येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. एका प्रकरणात आरोपीला विविध कलमांखाली एक वर्षापर्यंतची सक्तमजुरी व दंड, तर दुसऱ्या प्रकरणात आरोपीला तीन वर्षांची सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

पहिल्या प्रकरणात मंगेश बडोले याला शिक्षा
पहिल्या प्रकरणात फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरुण दिनांक २०/०१/२०२० रोजी आरोपी मंगेश ब्रह्मदास बडोले, वय ३० वर्षे, रा. कोहळीटोला, ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया याच्याविरुद्ध पोलीस ठाणे डुग्गीपार येथे गुन्हा क्रमांक २०/२०२० अन्वये भादंवि कलम ३५४, ३५४(अ), ३२३ व ४४१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी महिला आपल्या गावातील किराणा दुकानातून फेअर अँड लव्हली क्रीम व टूथपेस्ट खरेदी करून घरी जात असताना आरोपीने अंधाराचा फायदा घेत तिच्या जवळ जाऊन उजवा हात पकडून विनयभंग केला. फिर्यादीने आरडाओरड केल्यानंतर आरोपी तेथून पळून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार रविशंकर चौधरी ब. क्र. १०३४ यांनी केला. तपासादरम्यान भक्कम साक्षी-पुरावे गोळा करण्यात आले. त्यानंतर न्यायालयीन सुनावणीत आरोपी दोषी सिद्ध झाला.
मा. प्रियांका काजळे मॅडम, न्यायाधीश, प्रथम श्रेणी न्यायालय, सडक-अर्जुनी यांनी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपी मंगेश ब्रह्मदास बडोले याला भादंवि कलम ३५४ अंतर्गत १ वर्ष सक्तमजुरी व २१ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने सक्त मजुरी ,कलम ३५४(अ) अंतर्गत १ वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस शक्त मजुरी,
कलम ३२३ भां द वि अंतर्गत १ महिना सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास सक्त मजुरी, तसेच कलम ४४१ अंतर्गत १ महिना सक्तमजुरी व ५०० रुपये दंड , दंड न भरल्यास सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली.
दुसऱ्या प्रकरणात चंद्रशेखर प्यारेेलाल मेश्राम दोषी
दुसऱ्या प्रकरणात फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून दिनांक ८/१२/२०१९ रोजी आरोपी नावे चंद्रशेखर प्यारेेलाल मेश्राम, वय ४० वर्षे, रा. सितेपार, ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया याच्याविरुद्ध पोलीस ठाणे डुग्गीपार येथे गुन्हा क्रमांक २९९/२०१९, भादंवि कलम ३५४(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार अण्णा ब्राह्मणकर ब.नं. ८३१ यांनी केला. तपासात भक्कम पुरावे गोळा करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
मा. प्रियांका काजळे मॅडम, न्यायाधीश, प्रथम श्रेणी न्यायालय, सडक-अर्जुनी यांनी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपी चंद्रशेखर प्यारेेलाल मेश्राम याला भादंवि कलम ३५४(अ) अंतर्गत ३ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त सक्तमजुरी, दंड न भरल्यास ३ महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली.
दोन्ही प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे अॅड. ओमप्रकाश गहाणे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयीन कामकाजासाठी पो.हवा. चंदर गुटे, ब.नं. १५७३ यांनी पैरवी केली.
या दोन्ही प्रकरणांकडे गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी चानुपकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी विशेष लक्ष दिले.
