गोदिया शहर पोलिसांची धडक कारवाई; १ किलो ११ ग्रॅम गांजासह एक जण जेरबंद
गोंदिया : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर व अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे डब्लींग मैदान परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका इसमाकडून तब्बल १ किलो ११ ग्रॅम ओला गांजा आणि एक मोपेड गाडी असा एकूण १ लाख ५० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना, एक इसम ग्रे रंगाच्या टीव्हीएस जुपीटर मोपेड गाडीने (क्र. MH 35 AY 9242) मलन सभागृह ते डब्लींग कॉलनीकडे अवैधरीत्या गांजा घेऊन जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी डब्लींग मैदान परिसरात पंच व फोटोग्राफरसह येऊन संशयित मोपेड स्वाराला थांबवले.
चौकशीत त्याने आपले नाव मोसीन उर्फ मोनू खान वल्द मुस्ताक खान (वय २९, रा. जयपुरीया हॉस्पिटलजवळ, सिव्हील लाइन, गोंदिया) असल्याचे सांगितले. झडती घेतली असता त्याच्या गाडीच्या डिकीमध्ये लाल रंगाच्या पाॅलिथिनमध्ये हिरव्या रंगाचे शेंडे, बोंडे व बिजा असलेला ओला गांजा आढळला.गांजा: १ किलो ११ ग्रॅम (किंमत अंदाजे ५०,५५० रुपये),वाहन: टीव्हीएस जुपीटर मोपेड (क्र. MH 35 AY 9242, किंमत १,००,००० रुपये)एकूण मुद्देमाल: १,५०,५५० रुपये हस्तगत करण्यात आला.
आरोपी मोसीन उर्फ मोनू खान याच्या विरुद्ध पो.स्टे. गोंदिया शहर येथे अप क्रमांक १८४/२०२६ कलम ८(क), २०(ब), २९ एनडीपीएस ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मपोउपनि प्रियंका बैस करत आहेत.
सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे, डी.बी. पथकाचे सपोनि. वैभव गोडाम, सपोनि. संदीप मडावी, म.पो.उपनि. प्रियंका बैस, सफौ. कवलपालसिंग भाटीया, पोहवा/सुदेश टंभरे, पोहवा/निशीकांत लोंदैसे, पोहवा/कमलेश सहारे, पो.शि. दिनेश बिसेन, सुभाषक सोनवाने, अशोक रहांगडाले, मुकेश रवते, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे, राकेश बंजारे, अजय बोपचे, राकेश डोंगरवार यांनी पार पाडली आहे.
