Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

चंद्रिकापुरेंच्या हस्ते दोडके/जा. येथे 35 लाख रुपये विकास कामाचे भूमिपूजन

सडक/अर्जुनी – MKM NEWS 24 –

दिनांक ०७/०९/२२ बुधवार रोजी ग्राम.जांभळी/दो येथे ५०५४ अंतर्गत जांभळी ते तालुका सिमे पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता २५ लक्ष व २५१५ अंतर्गत शामराव टेकाम ते छबीलाल टेकाम यांचा घरा पर्यंत सिमेंट रस्ता १० लक्ष असे एकूण ३५ लक्ष रुपयांचे विकास कामांचा भूमिपूजन आमदार श्री.मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते करणात आले.

यावेळी श्री. मनोहर चंद्रिकापुरे यांनी म्हटले की, तुमच्या सर्वांचे सहकार्य आणि आशीर्वाद नेहमी खंबीरपणे पाठीशी असतात आणि याच सहकार्याच्या, आशीर्वादाच्या पाठबळावर आम्ही विकास कामे करत आहोत. गावाचा विकासाच्या दृष्टिकोनातून ही सर्व विकास कामे होणे अत्यंत गरजेचे होते. दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती आज पूर्ण करत आहे. अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्राचा सर्वांगिनी विकास व्हावा हेच माझा ध्येय आहे.

याप्रसंगी राकाँप जिल्हाध्यक्ष गंगाधरजी परशुरामकर, सरपंच रंजीत कोराम उपसरपंच सोनवणे नेहरूजी ऊके, भीमराव मंडारे, निलेश बावणे, रवींद्र कोराम, मनोज राऊत, जीवन कावळे, प्रकाश पालेवार, अनिल फरदे, विशाल कोचे, मनीषा बावणे , व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!