प्रशांत शहारे यांची भारतीय युवा मोर्चा गोंदीया जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड

गोंदीया, दि. 01 फेब्रुवारी : सदयस्थितीत महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकारसोबत भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती आहे. २०२४ च्या निवडणुकीत सर्वच पक्ष आपली ताकत अजमावू पाहत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही राज्यात आपले संघटन मजबूत करण्यासाठी कंबर कसलेली आहे. गोंदीया जिल्ह्यात भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे व राहुल लोनिकर यांच्या सूचनेवरून भारतीय जनता युवा मोर्चा गोंदीया जिल्हा कार्यकारीणी गठीत करण्यात आली आहे.
उपेंद्र कोठेकर , येशुलाल उपराडे गोंदीया जिल्हाध्यक्ष , भाजपा, विरेंद्रजी अंजनकर संपर्क प्रमुख भंडारा-गोंदीया यांच्या मार्गदर्शनात व ओम कटरे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गोंदीया यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत केसर शहारे यांची भारतीय युवा मोर्चा गोंदीया जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल लक्ष्मीकांत धनगाये , विजय कापगते , संजय बारेवर , हर्ष मोदी , जितेंद्र साळवी , ललीत डोंगरवार , पराग कापगते , शिशीर येळे , तुकाराम राणे , विलास बागडकर , दिलेस सोनटक्के , मयूर रामटेके व गणेश कापगते आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.