Sunday, August 3, 2025
सड़क अर्जुनीक्राइम

डुग्गीपार पोलीसांची सौंदड रेती घाटातून रेती चोरी करणा-या ट्रॅक्टरवर कारवाई  

सडक अर्जुनी – दिनांक 31/07/2025 रोजी सायंकाळी 18/55 वा. सुमारास पोलीस स्टेशन डुग्गीपार कार्यक्षेत्रातील मौजा सौंदड ते राका डांबरी रोडाने चुलबंद नदी पात्रातून ट्रॅक्टरने रेती चोरी होत असल्याची गोपनीय बातमी मिळताच पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रेड कारवाई करून रेती चोरी करून वाहतुक करतांनी मिळून आलेल्या ट्रॅक्टर टॉली ला ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणण्यात आले व आरोपी चालक नामे कमलेश भरत ब्राह्मणकर वय 33 वर्षे व मालक नामे ओमप्रकाश सावजी चांदेवार वय 60 वर्षे दोन्ही रा.सौंदड यांचे विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर इंजिन क्र.MH35 G 8453 व ट्रॉली क्र.MH 35 AR 3792 किं.4,10,000/-रु. व त्यामध्ये एक ब्रास रेती किं.6000/-रु. असा एकुण 4,16,000/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीतांविरुद्ध कलम 303(2), 305(e), 49 भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही श्री.गोरख भामरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री.अभय डोंगरे सा. अप्पर पोलिस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, श्री.विवेक पाटील सा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री.गणेश वनारे पो.स्टे. डुग्गीपार, सफौ.विलास निर्वान, पोहवा आशिष अग्निहोत्री, पोना महेंद्र सोनवाने, संजीव चकोले, पोशी उद्धेभान रुखमोडे यांनी केली.

error: Content is protected !!