Tuesday, April 28, 2026
सड़क अर्जुनी

जागतिक महिला दिन विशेष: “महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ हक्क नव्हे, तर जबाबदारीची जाणीव” – मनिषा लाडे यांचे विचार

सडक अर्जुनी- ८ मार्च २०२६: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  महिला सक्षमीकरण, शिक्षण, स्वाभिमान, आणि स्वावलंबनावर बोलताना सडक अर्जुनी येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि जनरल स्टोअर्स ची दुकान चालविणारी स्वावलंबी महिला मनिषा लाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या,

महिला दिन हा फक्त एक दिवस नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रीशक्तीला मान देण्याचा आणि तिच्या संघर्षाला न्याय देण्याचा आहे. आजच्या काळात महिला शिक्षित होत आहेत, नोकरी करत आहेत, व्यवसाय चालवत आहेत, पण अजूनही अनेक ठिकाणी असमानता, घरगुती हिंसा आणि आर्थिक अवलंबन यांसारख्या समस्या कायम आहेत. माझ्या मते, सक्षमीकरण म्हणजे केवळ हक्क मागणे नव्हे, तर स्वतःची जबाबदारी ओळखून समाजाला बदलण्याची ताकद दाखवणे.” 

मनिषा सुशिल लाडे
मनिषा सुशिल लाडे

मनिषा लाडे पुढे म्हणाल्या, “मला वाटते की प्रत्येक महिला आपल्या क्षेत्रात छोटे-छोटे बदल घडवू शकते. मग ते घरात मुली-मुलांना समान वागणूक देणे असो, कामाच्या ठिकाणी इतर महिलांना प्रोत्साहन देणे असो किंवा समाजात जागृती निर्माण करणे असो. आज मी छोटीसी जनरल स्टोअर्स ची शॉप चालवत आहे, महिला बचत गट चालवत आहे या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचे संदेश पोहोचवते. माझ्या परीने वेळ मिळेल तेव्हा मी स्त्रियांच्या संघर्षाची, यशाची आणि प्रेरणेची माहिती सांगत असते. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व महिलांना सांगू इच्छितो की – स्वतःवर विश्वास ठेवा, एकमेकींना आधार द्या आणि समाजात सकारात्मक बदल घडवा.”

त्या म्हणाल्या, “आजच्या तरुण पिढीला एवढेच सांगायचे  की, स्त्री म्हणजे कमजोर नाही, तर ती शक्ती आहे. शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षित वातावरण हे प्रत्येक महिलेचे हक्क आहेत. पण हे हक्क मिळवण्यासाठी लढणेही आवश्यक आहे. पुरुषांनीही या लढ्यात सहभागी व्हावे, कारण समान समाजच खरा प्रगत समाज असतो.” माह्या महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

error: Content is protected !!