सडक अर्जुनी- वन विभागाची अवैध रेती वाहतुकीवर कारवाई
MKM NEWS 24 न्यूज नेटवर्क, सडक-अर्जुनी
सडक-अर्जुनी – तालुक्यातील सहवनक्षेत्र कार्यालय, कोहमारा अंतर्गत येणाऱ्या वडेगाव जवळील डोयेटोला ते उमरझरी नाला मार्गावर अवैध रित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन विभागाने पकडला.
सविस्तर, दिनांक 18/3/2026 रोजी बीट डूग्गीपार पर अंतर्गत मौजे वडेगाव नाला कक्ष क्रमांक 708 संरक्षित वन मधील डोयटोला नाल्यामध्ये अवैधरित्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये गौण उपज रेती भरून वाहतूक करताना आढळून आले असता, ट्रॅक्टर न. MH 35 AG 0695 ट्रॅक्टर मालक प्रणय अशोक फुंडे वय 30 वर्षे राहणार परसोडी,मिलिंद रामलाल झिगरे घाटबोरी वय 26 वर्षे , यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने,प्रदीप हत्तीमारे वनरक्षक यांनी कारवाही केली. सदरची कारवाई मा.उपवनरक्षक गोंदिया,सहायक वनसंरक्षक रोहियो व वन्यजीव गोंदिया यांचे मार्गदर्शनात करण्यात आली
अवैध रेती वाहतुकीमुळे वन परिसर आणि नाल्यांच्या पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याने अशा कारवाया सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
सध्या गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागांत अवैध रेती उपसा आणि वाहतुकीच्या घटना वाढल्या आहेत. वन आणि महसूल विभागाच्या संयुक्त कारवायांमुळे यावर अंकुश बसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
