Thursday, April 2, 2026
गोंदिया

खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना पोलिस संरक्षणाची मागणी; काँग्रेसकडून निवेदन

गोंदिया: भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे, तसेच दौऱ्यांच्या वेळी पोलिस स्कॉर्टिंग वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, दिनांक ३० मार्च २०२६ रोजी भंडारा-नागपूर महामार्गावर खासदार डॉ. पडोळे यांच्या वाहनाचा अपघात झाला. यापूर्वीही नागपूरजवळ अशाच प्रकारचा अपघात घडल्याने या घटनांबाबत संशय निर्माण होत असून, हा केवळ अपघात नसून काही विरोधकांकडून घातपाताचा प्रयत्न असू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात अशा प्रकारचे काही घातपाताचे प्रकार यापूर्वीही घडले असल्याचे निवेदनात नमूद करत, खासदारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. गोंदिया जिल्ह्यासह इतर ठिकाणी काही नेत्यांना पोलिस स्कॉर्टिंग सुविधा देण्यात आलेली असताना, खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनाही तीच सुविधा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच, खासदारांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची शक्यता लक्षात घेता, त्यांना योग्य सुरक्षा प्रदान करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.

काँग्रेस जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात आलेल्या या निवेदनात, प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन खासदारांना पोलिस स्कॉर्टिंग गाडी देऊन त्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे.

काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन क्षेत्रातील लोकप्रिय खासदार डॉ. प्रशांत पडोले यांना अतिरिक्त पोलिस सुरक्षा आणि पोलिस स्कॉटिंग गाडी  देण्याची मागणी केली. या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व माजी आमदार श्री दिलीप भाऊ बंसोड यांनी केले.

प्रतिनिधी मंडळाने पोलिस अधीक्षक  गोरख भामरे यांच्याशी सविस्तर चर्चा करत औपचारिक निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले की, खासदार प्रशांत पडोले हे सातत्याने जनहिताच्या प्रश्नांवर काम करत असून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलिस सुरक्षा आणि  पोलिस स्कॉटिंग गाडी देण्याची मागणी करीता निवेदन दिले आहे. तसेच ही सुरक्षा व्यवस्था तात्काळ लागू करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी प्रतिनिधी मंडळात मा. श्री गंगाधर परशुरामकर, मा. श्री राजकुमार ‘पप्पू’ पटले, मा. श्री शिव नागपुरे, मा. श्री देवचंद बिसेन, श्री अमान मेमन, श्री मिताराम बिसेन, श्री किशोर शेंडे, श्री रेवाशंकर पटले, श्री गंगाराम बावनकर, श्री शशिकांत लांजे, श्री नेवारे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!