Friday, April 24, 2026
क्राइमसड़क अर्जुनी

घाटबोरी तेली; ट्रॅक्टर कांड, डूग्गीपार ठाण्यात बाप लेका विरोधात गुन्हा नोंद!

MKM NEWS 24 – सुशिल लाडे

सडक अर्जुनी : तहसील कार्यालय सडक अर्जुनी द्वारे वाळू चोरी करणाऱ्या विरुद्ध कारवाही करणे सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील पंचवटी ठिकाणी महसूल विभागाने अवैध रित्या रेती वाहतूक करणाऱ्या सागर देवानंद वंजारी रा. घाटबोरी तेली यांच्या विना नंबर ट्रॅक्टर द्वारे अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडले आणि कारवाही केली. महसूल विभागाचे रेती चे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात येणार एवढ्यात तो ट्रॅक्टर जाणून भुजून सागर वंजारी द्वारे फसविण्यात आला जेणे करून निघनार नाही असे सांगितले जाते. महसूल विभागाच्या कर्मचारी सोबत मुलगा सागर देवानंद वंजारी आणि वडील देवानंद वंजारी यांची बाचाबाची झाली असल्याचे सांगतात. आणि वातावरण बिघडले. बिघडलेले वातावरण बघता तहसीलदार यांनी (महसूल विभागाने) डूग्गीपार पोलिसांना फोन करून घटना स्थळावर बोलावले आणि लगेच पोलिसांचा ताफा पोहोचला.

महसूल विभागाने फसलेले ट्रॅक्टर काढण्यासाठी प्रशासनाची मदत करा म्हणून घाटबोरी तेली येथील रवींद्र बारकू झिंगरे आणि त्याचा भाऊ सचिन झिंगरे दोघेही राहणारे घाटबोरी तेली यांना फोन केल्याचे सांगत असून ते एक सज्जन नागरिक म्हणून प्रशासनाची मदत करणे आपले कर्तव्य म्हणून त्यांनी आपला ट्रॅक्टर मौक्यावर नेले. सागर देवानंद वंजारी आणि देवानंद वंजारी यांनी तू आपला ट्रॅक्टर का आणलास!? याचा ट्रॅक्टर नाही पाहिजे!? हा ट्रॅक्टर वर बसणार नाही!? असे म्हणून वाद घालत शिवीगाळ,धमकी दिल्याचे सांगत  सचिन झिंगरे आणि रवींद्र झिंगरे यांनी आम्ही पोलिसांत तक्रार देणार म्हणत फोन करून MKM NEWS 24 सोबत बोलताना सांगितले.

माहिती नुसार सचिन झिंगरे यांनी प्रशासनाच्या मदतीला आणलेला ट्रॅक्टर सागर देवानंद वंजारी यांनी प्रशासनाच्या समोरच घेऊन पसार झाल्याचे सांगतात. सचिन झिंगरे यांनी प्रशासनावर आरोप करीत सांगितले की, तहसीलदार यांच्या म्हणण्यानुसार मी प्रशासनाची मदत म्हणून ट्रॅक्टर आणले आणि प्रशासनाच्या समोरच सागर देवानंद वंजारी यांनी माझा ट्रॅक्टर घेऊन प्रसार झाला आणि आपल्या घरी नेवून ठेवला असे सांगितले जाते. मदतनीस सचिन झिंगरे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना म्हणाला की, तुम्ही माझ्या सोबत आहा की, त्याच्या सोबत आहा , तुमच्या समोर माझा ट्रॅक्टर घेऊन पसार झाला आणि तुम्ही काहीच नाही करत, असे म्हणत प्रशासनावर नाराजी आणि आरोप केले, एक तर प्रशासन म्हणते शासनाला सहकार्य करा आणि केले तर तुम्ही सर्व साधारण माणसाला असे फसवता अशी शोकांकिता व्यक्त केली. नंतर प्रशासनाद्वारे फोन केला असता त्यांनी पसार ट्रॅक्टर घरी सोडला असे सांगितले जाते.

परंतु सचिन झिंगरे यांचे म्हणते आहे की, अगर माझा ट्रॅक्टर ला कमी जास्त झाला असता किंवा काही हानी झाली असती तर त्याचा जिम्मेदार कोण!? असा खडा सवाल व्यक्त केला. प्रशासनाची मदतीला धावून आलेला सचिन झिंगरे यालाच शिवीगाळ, धमकी दिल्याने त्याच्या परिवारास धोका निर्माण झाला असल्याचे सांगत सचिन झिंगरे हे पोलिस स्टेशन ला रिपोर्ट देण्यासाठी गेले. परंतु प्रशासनाच्या समोरच सर्व घटना घटनूही एकही प्रशासनाचा (महसूल विभाग) अधिकारी सपोर्ट म्हणून सचिन झिंगरे सोबत पोलिस स्टेशन मध्ये आला नाही अशी शोकांकिता त्यांनी व्यक्त केली. काम झाला माझा , तू पाय तुझा, अशी भूमिका महसूल विभागाने घेतली असल्याचे आरोप सचिन झिंगरे यांनी केले. झालेल्या सर्व प्रकरणाची माहिती डूग्गीपार पोलिस ठाण्यात दिली सचिन झिंगरे यांनी तोंडी रिपोर्ट दिली.
दिलेल्या रिपोर्ट नुसार..

फिर्यादीस धमकी , शिवीगाळ, प्रकरणी देवानंद वंजारी आणि मुलगा सागर देवानंद वंजारी ह्या दोन व्यक्तींविरुद्ध एनसीआर (अदखलपात्र गुन्हा) दाखल करण्यात आला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सन्माननीय श्री. देवानंद वंजारी हे मा. सरपंच घाटबोरी/तेली असून ग्रामपंचायत चे प्रशासक सुद्धा असल्याचे सांगण्यात येते.

ही कारवाई दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी करण्यात आली. पोलीसां द्वारे मिळालेल्या NCR नुसार , तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींनी किरकोळ कारणावरून वाद घालत शिवीगाळ व धमकी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 19 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 352  व 351(2) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेची नोंद एनसीआर क्रमांक 0102/2026 अशी करण्यात आली आहे.
पुढील तपास डूग्गीपार पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

error: Content is protected !!