वाळू चोरांवर महसूल विभागाचा दणका; कारवाही दरम्यान पोलिस बंदोबस्त
MKM NEWS 24 – सुशिल लाडे….
सडक अर्जुनी : सडक अर्जुनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर महसूल विभागाने जोरदार कारवाईचा बडगा उगारत वाळू माफियांना जबरदस्त दणका दिला आहे. अनेक दिवसांपासून प्रशासनाच्या डोळ्यांत धूळफेक करून बिनधास्तपणे वाळू माफिया राज सुरू असलेल्या या काळ्या धंद्यावर महसूल विभागाने अचानक छापा टाकत वाळू चोरांच्या मुसक्या सध्या तरी आवळल्या. 
सांगायचे म्हणजे ” अरे दीवानों मुझे पहचानो कहासे आया मै हु कौन?…. मै हु डॉन…मै हु..डॉन… म्हणत आपला अवैध वाळू,मुरूम खनन चा काळा साम्राज्य बिनधास्त पने चालवत असतात. सर्व साधारण लोकांमध्ये आपली एक दहशद निर्माण करून आणि राजकीय लोकांशी आपली जवळीक साधून आपला काळा साम्राज्य चालवत असतात. परंतु सध्या तरी महसूल विभागाने वाळू माफियांना चांगलाच दणका दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागाने रेती तस्करांचे तीन ट्रॅक्टर पकडले आहे. यात आज दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी घाटबोरी तेली येथील रहिवाशी सागर देवानंद वंजारी याला विना परवाना अवैध रित्या विना नंबर च्या ट्रॅक्टर ने अवैध रित्या रेती वाहतूक करताना घाटबोरी / को. ( पंचवटी) येथे पकडण्यात आले. सुत्रांनी सांगितले की, वाळू माफिया यांनी आपला ट्रॅक्टर जाणून भुजून फसवून घेतला जेणे करून ते निघणार नाही. कारवाही दरम्यान वातावरण बिघडले असल्याचे बोलले जाते. महसूल विभागाने पोलिस विभागाला मौक्यावर बोलावले. पुढील कारवाही झाल्यानंतर त्याचे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा आहे आणि दंडात्मक कारवाही सुरू असल्याचे महसूल विभागाने सांगितले आहे. 
तसेच दिनांक 18 एप्रिल 26 रोजी रात्रीला बाम्हनी /खडकी येथील तुकाराम शिवणकर यांचे ट्रॅक्टर तर दुसरे ट्रॅक्टर अज्ञात वाळू माफिया यांचे रेती भरून ठेवलेला दुसरा ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केला गेला आहे. सदर अज्ञात ट्रॅक्टर चे मालक व वाहक चालक मौक्या वरुण फरार झाले. मात्र महसूल विभागाची दंडात्मक कारवाही केल्याचे सांगितले.
तालुक्यातील कित्येक ठिकाणी रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूची चोरी सुरू असते. नियमांचा सपशेल बोजवारा उडवत, शासनाला लाखो रुपयांचा महसूल तोटा करून काही मोजक्या लोकांनी स्वतःच्या खिशात पैसा ओतण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र महसूल विभागाने थोडी फार कारवाई करत या वाळू माफियांना चांगलाच दणका दिला.
कारवाई दरम्यान तीन ट्रॅक्टर, ट्रॉली जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे वाळू चोरांमध्ये एकच खळबळ उडाली असून, “आता कुणाचीही गय नाही” असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत, “अशाच प्रकारे सतत कारवाई झाली पाहिजे, तरच वाळू माफियांचा बंदोबस्त होईल,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, महसूल विभागाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, अवैध वाळू उत्खनन किंवा वाहतूक करणाऱ्यांवर यापुढे आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असून, कोणालाही सूट दिली जाणार नाही. त्यामुळे वाळू माफियांनी आता आपले बेकायदेशीर धंदे तात्काळ बंद करावेत, अन्यथा पुढील कारवाई अधिक कठोर आणि थेट असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
