Sunday, April 26, 2026
सड़क अर्जुनी

सडक अर्जुनीच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

सुशिल लाडे…..

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी येथील आठवडी बाजारात मागील आठवड्यात शनिवार आठवडी बाजार मध्ये मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये  वाढ झाली असून चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र समोर येत आहे. एक दुकानदार व्यापारी ने सांगितल्या प्रमाणे बाजारात त्याचा मोबाईल चोरीला गेला असता त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याने सांगितले की ५ ते ६ मोबाईल चोरीच्या तक्रारी ठाण्यात दाखल करण्यात आले. काही वर्षा पूर्वी शनिवारी आठवडी बाजारात प्रत्येक शनिवारी मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीच्या घटनां झाल्या होत्या. तेव्हा जास्त प्रमाणांत पोलिस बंदोबस्त वाढविला असतात मोबाईल चोरीच्या घटना झाल्या नव्हत्या.

परंतु सध्या मोबाईल चोर टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरटे संधी साधून मोबाईल लंपास करत आहेत.

गेल्या काही आठवड्यांत अनेक नागरिकांचे मोबाईल चोरीस गेल्याच्या तक्रारी समोर आल्या असून काहींनी पोलिसांत धाव घेतली आहे. विशेषतः खरेदीच्या गर्दीत, गोंधळाच्या वातावरणात आणि लक्ष विचलित झालेल्या क्षणी चोरटे आपले हात साफ करत असल्याचे दिसून येते.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी मोबाईल सुरक्षित ठेवणे, अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवणे, तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवणे, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांकडून पोलिस प्रशासनाने आठवडी बाजारात विशेष बंदोबस्त ठेवावा, सीसीटीव्ही निरीक्षण वाढवावे आणि गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. वेळेत योग्य पावले उचलल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

(जनजागृती संदेश)

“आपला मोबाईल – आपली जबाबदारी! गर्दीत सतर्क रहा, चोरीपासून स्वतःचे संरक्षण करा.”

error: Content is protected !!