Friday, April 24, 2026
सड़क अर्जुनी

डुग्गीपार पोलिसांची धडक कारवाई; गौ तस्करी प्रकरणात 6.20 लाखांचा मुद्देमाल जप्त!

सडक अर्जुनी – गोंदिया जिल्ह्यातून नागपूरकडे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गौ तस्करीवर डुग्गीपार पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे 6 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, गोरेगाव–गोंदिया मार्गावरून एक बोलेरो पिकअप वाहनातून गौ तस्करी करत नागपूरच्या दिशेने वाहतूक सुरू आहे. या खात्रीशीर माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून तपासणी मोहीम राबवली. दरम्यान, संशयास्पद बोलेरो पिकअप (क्रमांक MH 40 CD 2793) थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये गौ तस्करी होत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाहनासह सुमारे 6.20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस कर्मचारी जागेश्वर उके, खोटेले, मुळे व महेंद्र चौधरी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या धडक कारवाईमुळे गौ तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास डुग्गीपार पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!