Friday, May 22, 2026
सड़क अर्जुनी

सडक अर्जुनी शहर झाला घामाघूम, पारा ४४ अंशांवर

सुशिल लाडे….

सडक अर्जुनी : मे महिन्याच्या अखेरीस उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून सडक अर्जुनी शहर अक्षरशः घामाघूम झाले आहे. आज २२ में ला शुक्रवारी दुपारच्या सुमारास तापमानाचा पारा तब्बल ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवत होता, तर दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.

कडक उन्हामुळे बाजारपेठेतही नागरिकांची वर्दळ कमी झाली होती. अत्यावश्यक कामांशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. दुपारच्या वेळी मुख्य चौक, बसस्थानक परिसर तसेच बाजारपेठेत तुलनेने कमी हालचाल दिसून आली. उष्ण वाऱ्यांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. 
दरम्यान, वाढत्या तापमानामुळे थंड पेय, उसाचा रस, लिंबूपाणी आणि आईस्क्रीम विक्रेत्यांकडे नागरिकांची गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागातही पाण्याची मागणी वाढू लागली असून काही भागात पाणीटंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगरपंचायत ने शहरातील संपूर्ण  वॉटर आरो सुरळीत दुरुस्त करावे जेणे करून नागरिकांना जीवघेण्या उन्हात गार पाणी पिहून आपली गळा शांत करतील.

प्रशासनाने  नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे तसेच डोक्यावर टोपी किंवा कापड वापरण्याचा सल्ला दिला आहे. विशेष करून लहान मुले, वृद्ध नागरिक यांची काळजी घ्यावी. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस नवतपा लागणार असून उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!