विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ हजारोंचा मोर्चा; राष्ट्रपतींना निवेदन
सडक अर्जुनी : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सडक अर्जुनी येथे गुरुवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, युवक, युवती, विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.


निवेदनात विद्यार्थ्यांवरील कारवाईची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने विचार व्हावा तसेच युवकांच्या रोजगार व शिक्षणाशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.


या आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या मोर्चामुळे परिसरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते.
