धासगड येथील पाण्याच्या झऱ्यात दोन युवक बुडाले; शोधकार्य सुरू
सुशिल लाडे….
गोंदिया / देवरी : चिचगड पोलीस स्टेशन हद्दीतील धासगड येथील पाण्याच्या झऱ्यात दोन युवक बुडाल्याची घटना शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजताच्या सुमारास घडली. घटनेची प्राथमिक माहिती चिचगड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा लखन कापगते (वय २० वर्षे) आणि हेतराम गुलाब सयाम (वय २५ वर्षे) हे दोन्ही युवक पाण्याच्या झऱ्यात बुडाल्याचे सांगण्यात आले आहे. दोघेही रा. बोपाबोडी (सौंदड), ता. सडक अर्जुनी येथील रहिवासी आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून दोन्ही युवकांचा शोध घेण्याचे कार्य सुरू करण्यात आले. मात्र, वृत्त लिहिपर्यंत दोन्ही युवकांचा शोध लागलेला नव्हता.
सदर घटनेबाबत पुढील तपास व शोधकार्य सुरू असून, सविस्तर अहवाल स्वतंत्रपणे सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
