राजकुमार बडोले फाऊंडेशनद्वारे ‘आमदार खेल महोत्सव’ आजपासून
सडक अर्जुनी- : माजी मंत्री आणि विद्यमान आमदार राजकुमार बडोले यांच्या राजकुमार बडोले फाऊंडेशनच्या वतीने युवा पिढीला खेळाच्या क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी ‘आमदार खेल महोत्सव’ SAPL 2026 दिवस रात्र कालीन क्रिकेट खेळी आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव १९ फेब्रुवारी २०२६ पासून २०,२१,२२ फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. सडक अर्जुनी येथील पंचायत समिती समोरील पटांगणावर सुरू होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आज दिनांक 19 फेब्रुवारी दुपारी 11 वाजे होणार आहे. 
या महोत्सवाचे उद्घाटक आमदार राजकुमार बडोले,अध्यक्ष म्हणून लायकराम भेंडारकर अध्यक्ष जिल्हा परिषद, स्पीज पूजक वीरेंद्र अंजनकर, दीपप्रज्वलन चेतन वळगाये सभापती, सह उद्घाटक तेजराम मडावी नगर अध्यक्ष, प्रशांत शहारे महामंत्री भाजप, तसेच अविनाश काशिवार, शारदा राजकुमार बडोले,राजेश काठाने, विलास बागडकर , कविता रंगारी, चंद्रकला डोंगरवार, निशा तोडासे, सुधा रहांगडाले, शीतल गौर,रजनी गिऱ्हेपुन्जे , रंजना भोई, ललित डोंगरवार, विवेक भेंडारकर आणि नगर पंचायत पदाधिकारी , पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत.
विजेता टीम ला प्रथम बक्षिक एक लाख, द्वितीय बक्षिक साठ हजार, तृतीय बक्षिक चाळीस हजार आणि इतर आकर्षक बक्षिक असणार आहे.
या महोत्सवाचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील तरुणांना खेळाच्या माध्यमातून शिस्त, संघटना आणि निरोगी जीवनशैलीची सवय लावणे असून, त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची संधी उपलब्ध करून देणे हे आहे. क्रिकेट खेळांच्या स्पर्धा या महोत्सवात घेण्यात येणार आहेत.
आमदार राजकुमार बडोले म्हणाले, “खेळ हे केवळ मनोरंजन नाही तर व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. आमच्या फाऊंडेशनमार्फत आम्ही दरवर्षी विविध सामाजिक आणि क्रीडा उपक्रम राबवतो. यंदा ‘आमदार खेल महोत्सव’ आयोजित करून आम्ही स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांच्या क्रीडा प्रवासाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व खेळाडूंना, प्रशिक्षकांना आणि पालकांना सहभागी होण्याचे आवाहन करतो.”
महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ट्रॉफी, सर्टिफिकेट, किट आणि आर्थिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. फाऊंडेशनच्या वतीने वैद्यकीय तपासणी, पोषण सल्ला आणि खेळाचे प्रशिक्षणही उपलब्ध करून देण्यात येईल.
इच्छुक खेळाडू आणि संघांनी फाऊंडेशन कार्यालयाशी किंवा आमदार कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी राजकुमार बडोले फाऊंडेशनच्या पदाधिकारी यांना संपर्क करावा.
खेळाच्या माध्यमातून नवीन ऊर्जा आणि नवीन यशस्वी खेळाडू निर्माण होवोत, हीच अपेक्षा!
