Wednesday, April 15, 2026
सड़क अर्जुनी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी

MKM NEWS 24 – डॉ. सुशिल लाडे

सडक अर्जुनी – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात परमपूज्य डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जिल्ह्यातील संघटनेच्या सर्व तालुका शाखेने अल्पोपहार वितरण,मठ्ठा वितरण,सरबत वितरण,रुग्णालयात फळ वितरण, टरबुज वितरण करून संघटनेची सामाजिक दायित्व पूर्ण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

सर्व तालुका अध्यक्ष तथा सर्व कार्यकारिणी व समस्त पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया फक्त शिक्षकांच्या हक्कासाठीच नाहीतर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सतत अग्रेसर असते. म्हणून शिक्षणाच्या मनातील संघटना म्हणून जिल्ह्यात नावारूपास आहे.

किशोर बावनकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया.

error: Content is protected !!