Wednesday, April 22, 2026
दिल्ली

महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप!, २१ एप्रिलपासून कामबंद,

प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र  राज्य महसूल कर्मचारी संघटना सडक अर्जुनी द्वारे पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचे पडसाद सडक अर्जुनी तालुक्यात उमटले आहेत.  सडक अर्जुनी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काल मंगळवार (दि. 21) पासून बेमुदत संपावर बसले आहेत.

सडक अर्जुनी/गोंदिया : जिल्ह्यातील महसूल तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर  आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा संप पुकारण्यात आला आहे.

माहितीनुसार, राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषतः जुनी पेन्शन योजना लागू करणे, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत स्पष्ट धोरण जाहीर करणे, रिक्त पदे भरणे, कंत्राटी व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायम करणे यांसारख्या प्रमुख मागण्या यामध्ये समाविष्ट आहेत.

तसेच, १०, २० व ३० वर्षांच्या सेवेनंतर लाभ मिळणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी प्रश्न सोडविणे, आरोग्य योजना लागू करणे, तसेच कर्मचाऱ्यांवरील अन्यायकारक कारवाई थांबविणे या मुद्द्यांवरही शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, असे संघटनांनी नमूद केले आहे.

संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की,

“शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास २१ एप्रिलपासून बेमुदत संप छेडला गेला आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.”

या संपामुळे महसूल विभागासह इतर शासकीय कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांना विविध सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

error: Content is protected !!