मका विक्रीकरीता शेतकऱ्यांनी 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करावी – DMO- विवेक इंगळे
गोंदिया, दि.22 : शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम 2025-26 मधील मका विक्रीकरीता शासनाचे अधिकृत BEAM पोर्टलवर शेतकऱ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी 1 ते 30 एप्रिल 2026 पर्यंत करण्याकरीता शासनाकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील सर्व मका उत्पाक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता आवश्यक त्या कागदपत्रासह जसे- रब्बी पणन हंगाम 2025-26 चा पीक पेरा नोंद असलेला ऑनलाईन 7/12 उतारा व नमुना 8, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, सामुहिक 7/12 उतारे असल्यास उताऱ्यावरील इतर व्यक्तींचे सहमती पत्र व आधार कार्ड इत्यादी.
खालील नमुद करण्यात आलेल्या शासकीय मका खरेदी केंद्रावर जाऊन दि.30 एप्रिल 2026 पर्यंत मका विक्रीसाठी ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी पूर्ण करावी व शासनाच्या मका खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, गोंदिया यांचेमार्फत करण्यात येत आहे.
