सोशल मीडियावर महापुरुषांबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ॲट्रॉसिटी कलमांची वाढ
सडक अर्जुनी, दि. ०९ : दिनांक ०८/०५/२०२६ रोजी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे आरोपी गौरेश बावनकर रा. कोसमतोंडी याच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा थोर महापुरुषांबाबत आक्षेपार्ह मजकूर, लेख व फोटो फेसबुकवर खोटे आयडी तयार करून प्रसारित केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 299,302 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तालुक्यातील बौद्ध बांधवांनी सदर आरोपी गौरेश बावनकर मु.कोसमतोंडी याच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी करीत निवेदन पोलिस स्टेशन ला दिले होते.

तसेच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह व जातीय तेढ निर्माण करणारे मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.
