गिऱ्हेपुंजे इंग्लिश पब्लिक स्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल
सडक अर्जुनी : गिऱ्हेपुंजे इंग्लिश पब्लिक स्कूल या विद्यालयाने यंदाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एस.एस.सी.) बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त करून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. 
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आलमशिफा शाहिद शेख हिने ८२.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच दुशांत सुखारे याने ८०.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला, तर राबिया खान हिने ७५.२० टक्के गुणांसह तृतीय स्थान प्राप्त केले.
याशिवाय रिद्धी राजगिरे हिला ७१.८० टक्के, मयंक काटेंगे याला ६७.८० टक्के तसेच सय्यम ताराम याला ६५.४० टक्के गुण प्राप्त झाले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
