सडक अर्जुनी नगर पंचायतच्या सिमेंट रस्त्याच्या कामात नियमांना तिलांजली?
सुशिल लाडे….
• वॉर्ड क्रमांक ७ येथील रोडच्या मधोमध असलेल्या मोठ्या झाडांमुळे अपघाताला आमंत्रण…
• आपत्कालीन परिस्थितीत अँब्युलन्स, फायर ब्रिगेट, जाणार कुठून?!
• सिमेंट रोड बनविले की लोकांच्या अंगणाला फ्लोरिंग केला.
•स्थानिक नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी
सडक अर्जुनी – सडक अर्जुनी शहरातील नगर पंचायत मध्ये काही प्रभागामध्ये सध्या सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे.
सूत्रानुसार काही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय सावंगी द्वारे तर काही कामे नगरपंचायत द्वारे करण्यात येत आहेत.

सांगायचे म्हणजे वॉर्ड क्रमांक ७ बाजार चौक येथे सिमेंट रस्त्याचे काम नुकताच करण्यात आले. सूत्राने सांगितले की सदर काम हा अंदाजे १५ लक्ष रुपयाचा आहे. नागरिकांनी आरोप करीत सांगितले सदर कामाचे माहिती फलक सुद्धा लावण्यात आले नाही. कामाचे इस्टिमेट सार्वजनिक रित्या न करता नागरिकांना अंधारात ठेवून आपल्या मर्जीने कामे केले. इस्टिमेट अनुसार कामाची रुंदी, आणि कामे ही निकृष्ट स्वरूपाचे करण्यात आल्याचे चर्चा रंगत आहे.
विशेष म्हणजे कंत्राटदाराने सिमेंट बनविला की लोकांच्या अंगणाला फ्लोरिंग केला आहे. कुठे कुठे रोडची थीकनेस दिसतच नाही. दुसरी कडे तर रोड च्या मधोमध मोठे झाड असून ते सुद्धा काढल्या गेले नाही. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आपत्कालीन परिस्थितीत अँब्युलन्स, फायर ब्रिगेट , त्याच रोड ने जाणे असल्यास अडचण निर्माण होऊ शकते. नगरपंचायत ने या विषयाकडे जातीने लक्ष द्यायला पाहिजे.

काम सुरू असताना कुठलानी शासकी इंजिनिअर जागेवर उपस्थित न्हवता मजूर वर्गच स्वतःला मोठे इंजिनिअर समजून मसाला तयारं करून सिमेंट रस्त्याचे काम केले. त्याच प्रमाणे प्रभाग क्रमांक ५ येते आई टी आई च्या मागील बाजून असलेले रोड सुद्धा दिनांक १० मे रोजी तयार करण्यात आले असता. माहिती नुसार गोंदियातील एका कंत्राटदारांनी हे कामे केल्याचे सांगितले जाते. तिथे सुद्धा कुठल्याही प्रकारच्या माहिती फलक लावण्यात आले नाही. रोड तयार करतांना संबंधित डिपार्मेंट चा अभियंता उपस्थित न राहता मजूर वर्ग आपल्या मर्जीने रोड तयार करत होते.
अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित ठिकाणी दर्जाहीन साहित्याचा वापर, निकृष्ट दर्जाचे काम तसेच तांत्रिक नियमांना डावलून काम सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली जाडी, मजबुतीकरणाची प्रक्रिया तसेच पाण्याची योग्य देखभाल न करता घाईगडबडीत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही ठिकाणी नव्याने टाकलेला सिमेंट रस्ता काही दिवसांतच तडकू लागल्याचेही समोर आले आहे. तर एका सुजान नागरिकांनी सांगितले की, नगरपंचायत आमच्या सुवेधाकरीता सिमेंट रोड बनविले तर काही उपकार करून राहिले का? ते त्यांचे कामच आहे.

कदाचित त्यामुळे इत्यादी कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
थेट मुद्दा –
शासनाद्वारे जनसुविधे करिता नागरिकांना रोड नाल्या (विकास कामे) चे बांधकाम करण्यात येत असते. परंतु काही कंत्राटदार फक्त भरपूर पैसे कमविण्यासाठी नगर पंचायत चे कामे करीत असतात आणि तेही अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामे असतात. कदाचित शहरातील नागरिक काही तक्रार करीत नसल्यामुळे कंत्राटदाराचा मनमर्जी कारभार सुरू असतो असे म्हणणे व्हावे ठरणार नाही. नागरिकांत चर्चेचा विषय आहे की, कंत्राटदारांची नगरपंचायत ची कामे करणे म्हणजे जास्त प्रमाणात कमी वेळात भरपूर पैसे कमविण्याची शाखाच आहे.
दरम्यान, नागरिकांनी संबंधित नगर पंचायत प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कामाची तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत PWD विभागाशी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता, अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
सारंग खांडेकर मुख्याधिकारी नगर पंचायत
” बांधकामाचे फलक लावणे आवश्यक आहे. चौकशी करायला सांगते. तर काही कामे pwd मार्फत आहेत त्यांना लक्ष द्यायला पाहिजे.”
