Tuesday, May 12, 2026
सड़क अर्जुनी

सडक अर्जुनी तालुका काँग्रेस कमिटीचे डूग्गीपार पोलीस ठाण्यात निवेदन, महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

सडक अर्जुनी : सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह व अपमानास्पद मजकूर प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गौरेश बावनकर याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सडक अर्जुनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात खासदार प्रशांत पडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत डूग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश वणारे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून समाजात द्वेष आणि तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रकारांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

निवेदन देताना भंडारा गोंदिया चे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, तालुका अध्यक्ष मधुसूदन दोनोडे, माजी जी. प . सदस्य तथा सरपंच गंगाधर परशुरामकर , रोशन बडोले, दिनेश हुकरे, अनिल मेश्राम, किशोर शेंडे, वीरू गौर, भोजराज मसराम, स्वप्नील ब्राह्मणकर, शाहिद पटेल, सहेजाद अनवर अली, यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

error: Content is protected !!