जुगार अड्ड्यावर LCB ची धाड; ९ जुगाऱ्यांविरुद्ध कारवाई
९ जुगाऱ्यांविरुद्ध कारवाई; रोख रक्कम, ४ मोटारसायकल व ११ मोबाईलसह ६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया /देवरी : गोंदिया जिल्ह्यातील देवरी पोलीस ठाणे हद्दीतील मौजा जमनापूर येथील झुडपी जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा (एल.सी.बी.) गोंदियाने धाड टाकून ९ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत रोख रक्कम, ४ मोटारसायकल, ११ अँड्रॉइड मोबाईल आणि जुगार साहित्य असा एकूण ६ लाख ७० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
मा. पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एल.सी.बी. गोंदियाचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात एलसीबीचे पथक १७ मे २०२६ रोजी जिल्हा हद्दीत अवैध धंद्यांवर धाड टाकण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते.
दरम्यान, देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा जमनापूर येथील झुडपी जंगल परिसरात काही इसम ५२ तासपत्तीवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकली असता काही इसम जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये (१) नदीम नईम शेख वय ४६ वर्ष राहणार देवरी (२) अविनाशसिंग श्रीसंत बहादूर वय ३८ वर्ष राहणार बामणी चारभाटा छत्तीसगढ (३) राजेश ज्ञानीराम पटले वय ३२ वर्ष राहणार कन्हाळगाव देवरी (४) सज्जाद शफी पठाण वय ३४ वर्ष राहणार साखरीटोला सालेकसा (५) बालदीपसिंग निर्मलसिंग खानूजा वय ३४ वर्ष राहणार देवरी (६) जागेश्वर धनलाल कुत्तीर वय ४१ वर्ष राहणार मुल्ला (७) प्रतिमोल सुरेश डोंगरे वय २१ वर्ष राहणार सिंधीबीरी देवरी (८) जसविंदसिंग जोगेंदरसिंग भाटिया वय ५५ वर्ष राहणार देवरी (९) सपुरणसिंग अवतारसिंग भाटिया वय ६५ वर्ष राहणार देवरी यांचा समावेश आहे.
पंचासमक्ष आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून १ लाख २६ हजार ८५० रुपयांची रोख रक्कम, ४ मोटारसायकल, ११ अँड्रॉइड मोबाईल आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ६ लाख ७० हजार २७० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींकडे चौकशी केली असता सदर जुगार विजय मडावी (रा. देवरी) हा चालवत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आरोपी नदीम नईम शेख, अविनाशसिंग श्रीसंत बहादूर, राजेश ज्ञानीराम पटले, सज्जाद शफी पठाण, बालदीपसिंग निर्मलसिंग खानूजा, जागेश्वर धनलाल कुत्तीर, प्रतिमोल सुरेश डोंगरे, जसविंदसिंग जोगेंदरसिंग भाटिया, सपुरणसिंग अवतारसिंग भाटिया तसेच विजय मडावी यांच्या विरोधात देवरी पोलीस ठाण्यात पोहवा तुलसीदास लुटे यांच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक १९१/२०२६ अन्वये महाराष्ट्र (मुंबई) जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास देवरी पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
सदरची दर्जेदार धाड कारवाई मा.पोलीस अधिक्षक गोरख भामरे, अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे निर्देशान्वये पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर ,एल.सी.बी, गोंदिया यांचे मार्गदर्शनात पोहवा तुलसीदास लुटे, दिक्षीतकुमार दमाहे, संजय चौहान , प्रकाश गायधने, सुबोध बिसेन, इंद्रजित बिसेन, भोजराज बहेकार, पो.शि. सुनील डहाके, राकेश इंदूरकर, छगन विठ्ठले, एल.सी.बी, गोंदिया यांनी केली आहे.
