Thursday, May 28, 2026
सड़क अर्जुनी

निकृष्ट दर्जाच्या नाली बांधकामाविरोधात नागरिकांचा संताप ; नगर पंचायत सडक अर्जुनी वॉर्ड क्रमांक ५ मधील कामावर प्रश्नचिन्ह; नगरपंचायतीकडे लेखी तक्रार

सडक अर्जुनी : नगर पंचायत सडक अर्जुनी येथे जनसुविधे करिता लाखो करोडो रुपये निधी शासन खर्च करीत असते. उत्तम दर्जेदार रोड, नाली, आणि इतर सुविधा उपलब्ध ह्वावी याकरिता शासन कटिबद्ध असते. परंतु फक्त नगर पंचायत चा माल सुताव अभियान सध्या नगर पंचायत सडक अर्जुनी येथे धूम धडाक्यात सुरू असल्याचे दिसत आहे.

फक्त जास्त प्रमाणात पैसे कमविण्यासाठी लाखो रूपयाचा रोड नाल्या तयार करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामे केली जात आहेत. सांगायचे म्हणजे वॉर्ड क्रमांक ५ मध्ये नुकताच करण्यात आलेल्या नाली बांधकामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याचा आरोप करत नगरपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रोडच्या मधोमध असलेले मोठा खड्डा

सविस्तर असे की, वॉर्ड क्रमांक ५ येथील रहिवाशी रंजना संजय रोकडे यांच्या लेखी तक्रार अनुसार , नाली बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आला असून नालीचे ढक्कन हे काही कालावधीतच फुटले असून नाली ओपन झाली आहे. रोड च्या मधोमध मोठा खड्डा पडून काही नागरिक त्या खड्ड्यात पडले असून गंभीर दुखापत सुद्धा झाली असल्याचे सांगितले जाते. मुख्य म्हणजे रोकडे यांनी सांगितले की, सदर कामाचा कुठलाही माहिती फलक लावण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संब्रह निर्माण होते की कामे कोणत्या वार्डाची आहेत. त्यांनी ६ प्रभागाच्या नगरसेवक यांना संपर्क केला त्यांनी सांगितले माझा वॉर्ड नाही तो ५ नंबर वॉर्ड आहे. त्यांनी ५ नंबर च्या वॉर्ड मेंबर ला संपर्क करून प्रकरण सांगितले त्यांनी बघतो असे म्हणाले. वॉर्ड मेंबर कोणीही असो कामे नगरपंचायत हद्दीत आहेत. नगरपंचायत ने जातीने लक्ष द्यायला पाहिजे.

नाहीलाजाने रोकडे मॅडम यांनी नगरपंचायत ला लेखी तक्रार आणि जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया कडे प्रतिलिपी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य म्हणजे जागोजागी नालीचे ढक्कन तुटले असून रोड मध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे  भविष्यात सुद्धा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. प्राप्त माहिती नुसार सदर नाली बांधकाम गोंदिया येथील कंत्राटदार नीरज अग्रवाल यांनी केले असून सार्वजनिक बांधकाम विभाग सावंगी कार्यालय यांच्या मार्फत हे निकृष्ट दर्जाचे कामे केले आहेत. नाली चे धक्कन हे कित्येक ठिकाणी फुटलेले आहेत.

बांधकामाची मजबुती व दर्जा अत्यंत खराब आहे. काही ठिकाणी सिमेंटचे प्रमाण कमी असल्याने बांधकामाला तडे जात असल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. तसेच काम सुरू असताना आवश्यक तांत्रिक देखरेख केली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, पावसाळा तोंडावर असताना दर्जाहीन नाली बांधकामामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते. शासनाचा निधी खर्च करूनही निकृष्ट काम होत असल्याने संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाला लेखी निवेदन देत सदर बांधकामाची तात्काळ चौकशी करून कामाची गुणवत्ता तपासावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, आणि संबंधित कंत्राटदार याला काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी केली आहे. ह्या सर्व बाबी बदल mkm news 24 ने PWD विभाग सावंगी येथे विचारणा करण्याची केली असता त्यांनी कंत्राटदाराला पत्र देहू आणि रिपेअर करायला सांगू असे म्हटले आहे. प्रश्न हा निर्माण झाला आहे की, नगरपंचायतने ते नगरसेवक असो की मुख्याधिकारी यांनी त्या कामाचे NOC देताना कामे उत्तम दर्जेदार झाल्याचे प्रमाणपत्र देताना कामे नीट तपासून पाहिली नाही काय? ज्या प्रभागात कामे सुरू आहे त्या प्रभागाच्या नगरसेवकाची काहीच जिम्मेदारी नाही काय? की माझ्या प्रभागातील कामे उत्तम झाली पाहिजे हे बघण्याची. निकृष्ट कामे केल्या नंतरही नगरपंचायत कार्यालय द्वारे कंत्राटदाराला NOC प्रमाणपत्र का दिले असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, या प्रकरणामुळे वॉर्ड क्रमांक ५ मध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.

 

” सदर नाली बांधकाम १० लक्ष रुपयाचा आहे. कार्यालय मार्फत संबंधित कंत्राटदार याला सूचना दिल्या आहेत आणि आणखी पत्र देवून जलद गतीने तुटलेली नाली आणि रोड दुरुस्त करण्यात येहील.”

जे.ई.आयशा डांगे.

PWD कार्यालय सावंगी.

error: Content is protected !!