Monday, June 15, 2026
सड़क अर्जुनी

NOC न घेता वन विभागाच्या जागेत खडीकरण? सडक अर्जुनी नगरपंचायत वॉर्ड क्र. ५ मधील प्रकार चर्चेत

• वन विभागाची परवानगी न घेता वन विभागाच्या जागेत खडीकरण? सडक अर्जुनी नगरपंचायत वॉर्ड क्र. ५ मधील प्रकार चर्चेत.

• खडीकरणासाठी चक्क मुरूम ऐवजी भीस चा वापर.

• खडीकरण साठी अवैध रित्या पहाडी वरीललच मुरूम आणि भिस वापरल्याचे आढळते..!?, महसूल विभागाने भीस आणि मुरूमची रॉयल्टी तपासावी नागरिकांची मागणी.

गोंदिया/सडक अर्जुनी : सार्वजनिक बांधकाम विभाग सावंगी अंतर्गत नगरपंचायत सडक अर्जुनीच्या वॉर्ड क्रमांक ५ मध्ये वन विभागाच्या मालकीच्या जागेवर आवश्यक परवानगी (NOC) न घेता खडीकरणाचे काम करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. काही जागरूक नागरिकांनी या बाबत वन विभागाला माहिती दिली. या प्रकरणामुळे संबंधित कामाची वैधता, निधीचा वापर आणि प्रशासकीय मंजुरी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य म्हणजे जिथून खडीकरण सुरू करण्यात आले तिथून कुठलाही मुख्य रोड दिसत नाही!?.

खडीकरणाची सुरवात झाली तरी कुठून!?

तिथे एक व्यक्तीचे घर आणि झाडे झुडपे दिसत आहेत. कामाच्या ठिकाणी माहिती फलक सुद्धा लावले नाही आहे. खडीकरणासाठी मुरूम चा वापर न करता चक्क भीस चा वापर करण्यात येत आहे. ते ही भीस जवळील पहाडीवरील आणल्या गेल्याचे सांगत आहेत कारण खडीकरण साठी वापरण्यात आलेल्या भीस आणि मुरूम ची तहसील कार्यालयात परवानगी घेतली काय? याची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तसेच त्याच वॉर्ड क्रमांक ५ मध्ये कोटांगले गुरुजी यांच्या घरासमोर नाली बांधकाम सुरू असून तिथे सुद्धा कोणतेही माहिती फलक लावण्यात आले नाही. तिथे सुद्धा नाली बांधकामात गैर प्रकार करीत असल्याचे नागरिक सांगत आहेत. कामे करणाऱ्या मजूर वर्गाने सांगितले की कोणी पेटी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचे नाव मुन्ना देशपांडे राहणार खोबा असे असून ते खडीकरण आणि नाली बांधकाम दोन्ही कामे करीत असल्याचे सांगितले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ज्या जागेवर खडीकरण करण्यात आले ती जागा वन विभागाच्या अखत्यारीतील असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत कोणतेही विकासकाम हाती घेण्यापूर्वी वन विभागाची पूर्वपरवानगी किंवा ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेणे आवश्यक असते. मात्र संबंधित कामासाठी अशी परवानगी घेण्यात आली होती का, याबाबत सडक अर्जुनी वन विभागाचे  वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) मिथुन देवचंद तरोने यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले वन विभागाची कोणतीही परवानगी दिली नाही, यापूर्वी सुद्धा यांनी खडीकरण कामे बंद करण्यात सांगितले होते. असे त्यांनी MKM NEWS 24 ला माहिती दिली.

नागरिकांनी या कामासंदर्भात मंजुरी आदेश, तांत्रिक मान्यता, वन विभागाची NOC, अंदाजपत्रक व निधी खर्चाचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. जर परवानगीशिवाय काम करण्यात आले असेल तर संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी पुढे येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

नागरिकांची मागणी :वन विभागाची NOC सार्वजनिक करावी., संबंधित विभागाने कामाचे इस्टिमेट सार्वजनिक रित्या करावे जेणे करून नागरिकांना माहिती मिळेल., कामाची प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी जाहीर करावी., निधी खर्चाचा तपशील उपलब्ध करून द्यावा., नगरपंचायत मध्ये बांधकाम करताना प्रत्येक कामाचे माहिती फलक कामाच्या पूर्वीच लावण्यात यावे, जेणे करून नागरिकांना कामाची संपूर्ण माहिती मिळेल. तसेच निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ट करावे ,नियमबाह्य काम झाल्यास जबाबदारांवर कारवाई करावी.

” वनविभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही.कामे बंद करण्यात सांगितले आहे. चौकशी करून निश्चित कारवाही करण्यात येईल.”

मिथुन देवचंद तरोने
(RFO)
वनविभाग कार्यालय
सडक अर्जुनी

error: Content is protected !!