Sunday, June 21, 2026
सड़क अर्जुनी

नगर पंचायत सडक अर्जुनी पोटनिवडणुकीत विशाल शहारे यांचा विजय

सडक अर्जुनी, दि. 21 जून : नगर पंचायत सडक अर्जुनी येथील ( वॉर्ड क्रमांक ११). या प्रभागातील रिक्त जागेसाठी 20 जून रोजी पार पडलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज (21 जून) तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल चंद्रशेखर शहारे यांनी 19 मतांच्या फरकाने विजय संपादन केला.

मतमोजणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल फुले यांना 104 मते मिळाली, तर काँग्रेसच्या मालती अनिल राजगिरे यांना 13 मते मिळाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अजय सूर्यवंशी यांना 4 मते प्राप्त झाली.

अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणाऱ्या विशाल चंद्रशेखर शहारे यांना सर्वाधिक 123 मते मिळाल्याने त्यांनी प्रतिस्पर्धी अतुल फुले यांचा 19 मतांनी पराभव करून विजय मिळविला.

निकाल जाहीर होताच विशाल शहारे यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. विजयानंतर समर्थकांनी फटाके फोडून व एकमेकांना मिठाई भरवून जल्लोष व्यक्त केला. या निकालामुळे नगर पंचायत परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने या विजयाकडे महत्त्वपूर्ण म्हणून पाहिले जात आहे.

निकाल थोडक्यात :

विशाल चंद्रशेखर शहारे (अपक्ष) – 123 मते

अतुल फुले (राष्ट्रवादी काँग्रेस) – 104 मते

मालती अनिल राजगिरे (काँग्रेस) – 13 मते

अजय सूर्यवंशी (शिवसेना उबाठा) – 4

मतविजयाचा फरक : 19 मते.

error: Content is protected !!