Sunday, August 23, 2026
सड़क अर्जुनी

आठ वर्षांनंतर हरवलेला मोबाईल परत; डुग्गीपार पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक

सुशिल लाडे 

सडक अर्जुनी/डुग्गीपार : नागरिकांच्या हरवलेल्या वस्तूंचा शोध घेऊन त्या त्यांच्या मुळ मालकांना परत करण्याच्या डुग्गीपार पोलिसांच्या कार्यतत्परतेचे आणखी एक कौतुकास्पद उदाहरण समोर आले आहे.

सडक अर्जुनी येथील MKM NEWS 24 चे मुख्य संपादक डॉ.सुशील लाडे यांचा OPPO कंपनीचा मोडल नंबर OPPO A3s मोबाईल सन 2018 मध्ये हरवला होता. त्याची तक्रार सुशिल लाडे यांनी पोलिसांत केली होती. आता मात्र तब्बल आठ वर्षांनंतर डुग्गीपार पोलिसांनी अथक प्रयत्न व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून सदर मोबाईलचा शोध घेतला. दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी हा मोबाईल त्याच्या मुळ मालक असलेले MKM NEWS 24 चे  मुख्य संपादक तथा पोलिस स्टेशन शांतता समितीची चे सक्रिय सदस्य डॉ. सुशील लाडे यांना पोलिसांनी परत केला.

सुशिल लाडे यांना मोबाईल परत करताना ठाणेदार कमलेश सोनटक्के

मोबाईल परत मिळाल्यानंतर सुशील लाडे यांनी डुग्गीपार पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. हरवलेली वस्तू अनेक वर्षांनंतरही शोधून नागरिकांच्या स्वाधीन करण्याची पोलिसांची कार्यपद्धती निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ठाणेदार कमलेश सोनटक्के, सहा.पो. नि .जावेद शेख, पोलिस कर्मचारी सुशील रामटेके पोलीस हवालदार,महेंद्र सोनवाणे  पो.ना., उदेभान रुखमोडे पो. शिपाई, गुणवंत कठाने पो.ह. , जगदीश मेश्राम पो. ह. तसेच शांतता समितीचे सदस्य म्हणून प.स.सभापती चेतन वळगाये, माजी.सभापती संगीता खोब्रागडे, शाहिद पटेल , युनुस पटेल, राजू शेख, सुबुर सौदागर आणि इतर सदस्य उपस्थित होते.

नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेणे आणि तो मुळ मालकाला परत करणे, हा पोलिसांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारा उपक्रम आहे. “पोलिस केवळ कायदा व सुव्यवस्था राखत नाहीत, तर नागरिकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशीही उभे राहतात,” याची प्रचिती या घटनेतून आली.

आठ वर्षांनंतर मोबाईल परत मिळाल्याने सुशील लाडे यांनी ‘धन्यवाद डुग्गीपार पोलीस!’ म्हणत पोलिसांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

error: Content is protected !!