आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते नगर पंचायत सडक अर्जुनी येथे स्वर्गरथ व गाळ उपसा वाहनाचे लोकार्पण
सुशिल लाडे
•नगर पंचायत सडक अर्जुनी येथे स्वर्गरथ व गाळ उपसा वाहनाचे लोकार्पण
•शहरातील विविध विकासकामांवर चर्चा
सडक अर्जुनी : नगर पंचायत सडक अर्जुनीच्या वतीने नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्वर्गरथ आणि गाळ उपसा वाहनाचे लोकार्पण अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगर पंचायत अध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, सभापती शाहिस्ता शेख, कमलादेवी अग्रवाल, सायमा शेख, मुख्याधिकारी सारंग खांडेकर, तसेच नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. 
नगर अध्यक्ष तेजराम मडावी यांनी नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या व विकासकामांबाबत यावेळी आमदार राजकुमार बडोले यांच्यासमोर चर्चा करण्यात आली.
सविस्तर बातमी, सडक अर्जुनी नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांना अंत्यविधीच्या वेळी स्वर्गरथाची सुविधा मिळावी, तसेच शहरातील नाल्या, गटारे व जलनिस्सारण व्यवस्था स्वच्छ ठेवण्यासाठी गाळ उपसा वाहनाचा उपयोग व्हावा, या उद्देशाने ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 
यामुळे नागरिकांना अंत्यविधीसाठी आवश्यक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून, गाळ उपसा वाहनामुळे नाल्यांमधील साचलेला गाळ व कचरा वेळेत काढण्यास मदत होणार आहे. परिणामी शहरातील स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.
शहरातील सांडपाणी व्यवस्थापन, तलावाचे सौंदर्यीकरण, पर्यावरण विभागाच्या माध्यमातून विकासकामे, पाणीपुरवठा व्यवस्था तसेच इतर आवश्यक नागरी सुविधांबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. तसेच दोन वर्षात प्रशासकीय इमारत तयार करू त्याकरिता निधी उपलब्ध करून दिली जाणार असे आमदार राजकुमार बडोले म्हणाले. बसस्थानकाच्या विकासासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
नागरिकांच्या सेवेसाठी स्वर्गरथ उपलब्ध झाल्याने गरजू कुटुंबांना मोठी सुविधा मिळणार आहे. तर गाळ उपसा वाहनामुळे नाले, गटारे व जलनिस्सारण व्यवस्थेतील गाळ काढण्याचे काम अधिक प्रभावीपणे करता येणार असून शहराच्या स्वच्छतेला चालना मिळणार आहे. 
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती..
तेजराम मडावी अध्यक्ष,वंदना डोंगरवार उपाध्यक्ष, शाहिस्ता शेरव सभापती, कमलादेवी अग्रवाल सभापती,सायमा शेख सभापती, सारंग खांडेकर मुख्याधिकारी, चेतन वडगाये सभापती पंचायत समिती सडक अर्जुनी, देवचंद तरोने नगरसेवक,महेंद्र वजारी नगरसेवक,गोपीचंद खंडेकर नगरसेवक, अंकीत भेंडारकर नगरसेवक,राजकुमार हेडावू नगरसेवक,असलेश अंबादे नगरसेवक, शशिकला टेंभुर्णे नगरसेविका, दिक्षा भगत नगरसेविका,रजनी परिहार नगरसेविका, रेणू अग्रवाल नगरसेविका,विशाल शहारे नगरसेवक,युगल दडमल प्रशासकीय अधिकारी अनुपम वाघमारे – कर व प्रशासकीय अधिकारी, -कर्मचारी , पत्रकार तसेच नागरिक उपस्थित होते. नगर पंचायतच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
