Friday, September 11, 2026
सड़क अर्जुनी

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर डूग्गीपार पोलिसांचा रूट मार्च

डॉ. सुशिल लाडे..

सडक अर्जुनी : आगामी सण-उत्सव  पोळा, मार्बद,आणि गणेश उत्सव शांततापूर्ण व सुरक्षित वातावरणात पार पडावेत तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने डूग्गीपार पोलिस स्टेशनच्या वतीने आज, दि. 10 सप्टेंबर रोजी सडक अर्जुनी शहरात  रूट मार्च काढण्यात आला.

या रूट मार्चला उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी – नंदिनी चानपूरकर, पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक जावेद शेख, रुपाली पवार पोलीस उपनिरीक्षक शेजाळ, सोनवणे, इत्यादी पोलीस अधिकारी, 30 पोलीस अंमलदार व 30 सैनिक रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते.

रूट मार्चची सुरुवात तहसील कार्यालय परिसरातून करण्यात आली. त्यानंतर दुर्गा चौक, मस्जिद परिसर , हनुमान मंदिर ( गुजरी चौक), शिव मंदिर , मेन रोड मार्गे पुन्हा तहसील कार्यालय परिसरात रूट मार्चची सांगता करण्यात आली.

आगामी सण-उत्सवांच्या काळात Chips व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
error: Content is protected !!