सौंदडमध्ये विविध ठिकाणी तान्हापोळा उत्सव उत्साहात
सौंदड, दि. ११ /०९/२०२६ –ग्राम सौंदड येथे लोकनियुक्त सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांच्या अध्यक्षतेखाली विविध ठिकाणी पारंपरिक तान्हापोळा उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. 
ग्रामातील पटेल वॉर्ड, गांधी वॉर्ड, कृष्ण वॉर्ड, शास्त्री वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड तसेच इतर विविध ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते, विविध समित्या, संस्था आणि युवक मंडळांच्या वतीने तान्हापोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 
लोकनियुक्त सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांनी विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहून बालकांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी आयोजक समिती, सामाजिक कार्यकर्ते व युवक मंडळांच्या कार्याचे कौतुक केले.
विशेषतः पटेल वॉर्ड येथील माऊली ग्रुपच्या वतीने लोकनियुक्त सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रेमपूर्ण सत्काराबद्दल मोदी यांनी माऊली ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे विशेष आभार मानले. 
याप्रसंगी मोदी यांनी सर्व आयोजक समित्या, सामाजिक कार्यकर्ते, संस्था, युवक मंडळे व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. अशा पारंपरिक उत्सवांमुळे आपली संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. 
तान्हापोळा उत्सवानिमित्त ग्राम सौंदडमधील सर्व नागरिकांना व बालकांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
