Monday, September 14, 2026
गोंदिया

कर्कश डीजेला ‘ब्रेक’! गणेशोत्सवासाठी गोंदिया पोलिसांचे कडक निर्देश”

सुशिल लाडे

गोंदिया – दिनांक :- १४/०९/२०२६- आगामी गणेशोत्सव उत्सव काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व सदर उत्सव शांततेत व सुरळीतपणे पार पडला जावा या दृष्टीने दिनांक १२/०९/२०२६ रोजी सकाळी ११.०० वा. प्रेरणा हॉल, पोलिस मुख्यालय गोंदिया येथे जिल्ह्यातील डि.जे. चालक मालक बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीचे अध्यक्ष मा. श्री गोरख भामरे, पोलिस अधीक्षक गोंदिया, उपविभागीय पोलिस अधिकारी, गोंदिया, पो.स्टे. प्रभारी अधिकारी व दुय्यम पोलिस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळ तसेच जिल्ह्यातील सर्व १०० डि.जे. चालक-मालक हे उपस्थित होते. सदर बैठकीस मा. पोलिस अधीक्षक गोंदिया यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या.

(१) सदर उत्सवाचे काळात डि.जे.चा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येते. मा. पोलिस महासंचालक सो मुंबई यांनी गणेशोत्सव निमित्ताने दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांनी तातडीची बैठक बोलावून गणेश उत्सव यांचे दरम्यान लेझर लाईट, मिड मिक्सर व फ्लिकर लाईटचा वापर होणार नाही याबाबत कडक निर्देश दिले.

(२) महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी डि.जे. बंदी बाबत धरणे मोर्चे सुरू आहेत. डि.जे.च्या कर्कश आवाजाने लोकांच्या जिवनशैलीवर परिणाम होऊन लोकांच्या जिवासहानी न होणे बाबत निर्देश दिले.

(३) ज्या-ज्या भागात आवाजाविषयी दिलेल्या नियमाप्रमाणे डि.जे.चा आवाज असणे अत्यावश्यक आहे. परंतु या पलीकडे आवाज वाढ झाल्यास तात्काळ संबंधित मंडळ व डि.जे. चालक मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

(४) डि.जे. वाहन हे वाहनाचे दोन्ही बाजूला पॅनल बाहेर काढून खूप प्रमाणात अपघात झाल्याचे घटना घडलेल्या आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभाग गोंदिया यांचेशी समन्वय साधून त्यांना जिल्ह्यातील सर्व डि.जे. वाहन चेक करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याचे आदेश पारित करून बेकायदेशीर रित्या डि.जे. वाहन आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

(५) सण-उत्सव किंवा इतर कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट, मिड मिक्सर व फ्लिकर लाईट आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

(६) मा. पोलिस अधीक्षक यांनी मिरवणुकांदरम्यान मर्यादांचे पालन करण्याबाबत, ध्वनी मर्यादेचे पालन करावे. मूर्ती विसर्जन मिरवणूक व विसर्जन हे सुरळीत व शांततेत पार पडावे. याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या तसेच उपस्थितीत असलेल्या सर्व डि.जे. चालक मालक यांना सूचना/समस्या समजून घेतल्या.

error: Content is protected !!