वाळूचे अवैध वाहतूक करणाऱ्या विरुद्ध ०८ आरोपीतांविरुद्ध कारवाई – ७ ब्रास वाळू, १ टिप्पर व ५ ट्रॅक्टर जप्त, एकूण ५०,७२, ०००/- रु. चा मुद्देमाल जप्त
गोंदिया – 16/09/26- मा. पोलीस अधिक्षक गोंदिया गोरख भामरे यांचे निर्देशाप्रमाणे व पोलीस पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे , स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनात दिनांक १४/०९/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया येथील पोलीस पथक जिल्हा हद्दीत अवैध धंदावर धाड करणेकामी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खात्रीशीर माहिती प्राप्त झाली कि पोलीस स्टेशन दवनिवाडा हद्दीत महालगाव घाट येथील वैनगंगा नदीचे पात्रातून वाळू काढून ट्रॅक्टरने अवैध रित्या वाहतूक करून विक्री करीत आहेत. मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहीतीच्या आधारे पोलीस स्टेशन दवनिवाडा हद्दीत मौजा महालगाव ते रतनारा कडे जाणाऱ्या रोडवर नाकाबंदी लावण्यात आली असता मौजा महालगाव ते रतनारा या मार्गावर पोलीस पथकास काही वेळात मौजा महालगाव कडून २ ट्रॅक्टर येतांना दिसून आले , पोलीस पथकाने दोन्ही ट्रॅक्टर थांबवून पंचासमक्ष पाहणी करण्यात आली असता दोन्ही ट्रॅक्टर मध्ये वाळू असल्याचे दिसून आले . चालकांना वाळू वाहतूक चे परवानाबाबत विचारन्यात आली असता त्यांनी सांगितले कि त्यांचेकडे वाळू वाहतुकीचे कोणतेही परवाना नसून सदर चे वाळू हे महालगाव घाट येथील वैनगंगा नदीचे पात्रातून चोरी करून विक्री करिता घेऊन जात आहेत.

दोन्ही ट्रॅक्टर चे चालक यांचे ताब्यातून खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
१) २ ट्रॅक्टर ट्रॉलीसह किमती १५,००,०००/- रुपये व २ ब्रास वाळू किमती १२,०००/- रुपये एकूण किमती १५,१२,०००/- रुपयेचा मुद्देमाल दोन्ही आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे.
आरोपी नामे ट्रॅक्टर चालक व मालक १) राजकुमार नैताम नागपुरे वय ३० वर्ष राहणार महालगाव तालुका जिल्हा गोंदिया ट्रॅक्टर चालक व मालक नामे २) जितेंद्र तिलकचंद ठाकरे वय ४४ वर्ष राहणार देवरी तालुका जिल्हा गोंदिया हे वाळू चे अवैध वाहतुक करीत असतांनी मिळून आल्याने नमुद आरोपीता विरुध्द पोलीस स्टेशन दवनींवाडा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच दिनांक १५/०९/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया येथील पोलीस पथक जिल्हा हद्दीत अवैध धंदावर धाड करणेकामी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खात्रीशीर माहिती प्राप्त झाली कि पोलीस स्टेशन रावणवाडी हद्दीत तेढवा व डांगुर्ली घाट येथील वैनगंगा नदीचे पात्रातून वाळू काढून ट्रॅक्टरने टिप्परने अवैध रित्या वाहतूक करून विक्री करीत आहेत. मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहीतीच्या आधारे पोलीस स्टेशन रावणवाडी हद्दीत मौजा तेढवा ते काटी गावाकडे जाणाऱ्या रोडवर नाकाबंदी लावण्यात आली असता मौजा तेढवा ते काटी या मार्गावर पोलीस पथकास काही वेळात मौजा तेढवा कडून १ ट्रॅक्टर व १ टिप्पर येतांना दिसून आले , पोलीस पथकाने ट्रॅक्टर व टिप्पर थांबवून पंचासमक्ष पाहणी करण्यात आली असता ट्रॅक्टर व टिप्पर मध्ये वाळू असल्याचे दिसून आले . दोन्ही वाहनाचे चालकांना वाळू वाहतूक चे परवानाबाबत विचारन्यात आली असता त्यांनी सांगितले कि त्यांचेकडे वाळू वाहतुकीचे कोणतेही परवाना नसून सदर चे वाळू हे तेढवा घाट येथील वैनगंगा नदीचे पात्रातून चोरी करून विक्री करिता घेऊन जात आहेत.

टिप्पर व ट्रॅक्टर चे चालक यांचे ताब्यातून खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
१) १ ट्रॅक्टर ट्रॉलीसह किमती ६,००,०००/- रुपये व १ ब्रास वाळू किमती ६०००/- रुपये एकूण किमती ६,०६,०००/- रुपये
२) १ टिप्पर किमती १५,००,०००/- रुपये व २ ब्रास वाळू किमती १२,०००/- रुपये एकूण किमती १५,१२,०००/- रुपये
असा एकूण २१,१८,०००/- रुपयेचा मुद्देमाल दोन्ही आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे.
आरोपी ट्रॅक्टर चालक नामे १) खिलेंद्र रामकिशोर म्हात्रे वय २९ वर्ष राहणार मरारटोला पोस्ट दासगाव जिल्हा गोंदिया व ट्रॅक्टर मालक २) प्रदीप खुशाल भुरे वय २२ वर्ष राहणार पांढराबोडी तालुका जिल्हा गोंदिया आरोपी टिप्पर चालक नामे ३) राहुल राजू उईके वय २५ वर्ष राहणार सलाईटोला व टिप्पर चा मालक नाव ४) यश राधेश्याम लिल्हारे राहणार गद्दाटोली गोंदिया हे वाळू चे अवैध वाहतुक करीत असतांनी मिळून आल्याने नमुद आरोपीता विरुध्द पोलीस स्टेशन रावणवाडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच दिनांक १६/०९/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया येथील पोलीस पथक जिल्हा हद्दीत अवैध धंदावर धाड करणेकामी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खात्रीशीर माहिती प्राप्त झाली कि पोलीस स्टेशन डुग्गीपार हद्दीत मौजा सालईटोला ते चिरचाळी मार्गावर ट्रॅक्टरने वाळू अवैध रित्या वाहतूक करून विक्री करीत आहेत. मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहीतीच्या आधारे पोलीस स्टेशन डुग्गीपार हद्दीत मौजा मौजा सालईटोला ते चिरचाळी गावाकडे जाणाऱ्या रोडवर नाकाबंदी लावण्यात आली असता मौजा चिरचाळी कडून काही वेळात २ ट्रॅक्टर येतांना दिसून आले , पोलीस पथकाने दोन्ही ट्रॅक्टर थांबवून पंचासमक्ष पाहणी करण्यात आली असता दोन्ही ट्रॅक्टर मध्ये वाळू असल्याचे दिसून आले . चालकांना वाळू वाहतूक चे परवानाबाबत विचारन्यात आली असता त्यांनी सांगितले कि त्यांचेकडे वाळू वाहतुकीचे कोणतेही परवाना नसून सदर चे वाळू हे उमरझरी नाल्यातून चोरी करून विक्री करिता घेऊन जात आहेत.
दोन्ही ट्रॅक्टर चे चालक यांचे ताब्यातून खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
१) २ ट्रॅक्टर ट्रॉलीसह किमती १२,००,०००/- रुपये व २ ब्रास वाळू किमती १२,०००/- रुपये एकूण किमती १२,१२,०००/- रुपये
असा एकूण १२,१२,०००/- रुपयेचा मुद्देमाल दोन्ही आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे.
आरोपी ट्रॅक्टर चालक मालक नामे १) आशिष राजकुमार राऊत वय २८ वर्ष राहणार डव्वा तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया व ट्रॅक्टर चालक मालक २) मेघनाथ सखाराम उंदीरवाडे वय ५३ वर्ष राहणार डव्वा तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया हे वाळू चे अवैध वाहतुक करीत असतांनी मिळून आल्याने नमुद आरोपीता विरुध्द पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळू चे अवैध वाहतूक करणाऱ्या ०८ आरोपीतांविरुद्ध कारवाई करून एकूण ७ ब्रास वाळू, १ टिप्पर व ५ ट्रॅक्टर जप्त करून एकूण ५०,७२, ०००/- रु. चा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे यांचे निर्देशान्वये पोलीस निरीक्षक श्री. श्री. रेवचंद सिंगनजुडे ,, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनात पोहवा संजय चव्हाण , पोहवा सोमेन्द्रसिंग तूरकर , पोहवा रियाज शेख , पोहवा दीक्षितकुमार दमाहे , पोहवा सुबोध बिसेन, पोहवा इंद्रजित बिसेन, पोहवा तुलसीदास लुटे, दुर्गेश तिवारी, पोशि छगन विठ्ठले, पोशि सुनील डहाके, पोशि निखिल मेश्राम, पोशि राकेश इंदूरकर चापोशी विलेश ठाकरे स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांनी केली.
