Wednesday, May 27, 2026
गोंदिया

ॲट्रॉसिटी कायद्याच्या सखोल माहितीसाठी जिल्हा पोलीस दलाची कार्यशाळा

गोंदिया, दि.26 : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ व सुधारणा अधिनियम २०१५ च्या प्रसिध्दी, जनजागृती, प्रभावी अंमलबजावणी व गुणवत्तापूर्ण तपासकामी सखोल माहितीसाठी जिल्हा पोलीस दलाची कार्यशाळा सोमवारी जिल्हा नियोजन भवन सभागृहात पार पडली. अपर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मार्गदर्शनात नागरी हक्क संरक्षण, नागपूर परिक्षेत्र, नागपूर अंतर्गत कार्यशाळा नागरी हक्क संरक्षण पथक यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती.

सदर कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना अॅड. एकता गणविर, पॅनल लॉयर जिल्हा व विधी प्राधिकरण, गोंदिया यांनी अॅट्रॉसिटी कायद्याची विस्तृत माहिती दिली. अॅड. क्रिष्णा पारधी, शासकिय अभियोक्ता, सत्र व जिल्हा न्यायालय गोंदिया यांनी महत्वाचे न्यायनिर्णय व कायद्याची माहिती व आरोपीचे दोषसिध्दीचे प्रमाण वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव यांनी अॅट्रॉसिटी गुन्हा नोंद करणे पासून ते तपास पूर्ण होईपर्यंतची विस्तृत माहिती दिली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव प्रमोद महामे, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा साहील झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया रोहीणी बानकर तसेच जिल्हा शासकीय अभियोक्ता अॅड. महेश चांदवानी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलीत करुन व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन पोलीस कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.

या पोलीस कार्यशाळेला गोंदिया जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक व तपासी अंमलदार असे एकूण ८५ पोलीस अधिकारी/पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेला लक्ष्मीकांत पाटील, पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड परिक्षेत्र, नांदेड, अतिरिक्त कार्यभार नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांचे मार्गदर्शनात तिर्थदास निंबेकार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नागरी हक्क संरक्षण पथक गोंदिया, पोलीस अंमलदार उत्तम दहिवले, संतोष राऊत, सचिन गेडाम, सतिश हत्तीमारे, गौरव गिरी, संगिता शरणागत नागरी हक्क संरक्षण पथक, गोंदिया यांनी सक्रिय सहभाग घेवून सदर कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडली. कार्यशाळेचे शेवटी तिर्थदास निंबेकार यांनी सर्व मान्यवर, पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!